फूड डिलीव्हरी कंपन्यांचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारात पाहता फूड डिलीव्हरी कंपन्यांचे समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यात झोमॅटो (इटर्नल) व स्विगी यांचा समावेश आहे. गुरुवारी शेअरबाजारात इटर्नलचे समभाग सलग दुसऱ्या दिवशी चांगला वाढला होता. समभाग 5.5 टक्के वाढीसोबत गुरुवारी 260 रुपयांच्या स्तरावर कार्यरत होता. गेल्या दोन सत्रात समभाग जवळपास 8.5 टक्के इतका वाढला आहे. ही वाढ जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनले यांच्या अहवालानंतर दिसली आहे. फर्मने इटर्नलला अहवालात समभागाला ओव्हरवेटचे रेटिंग दिले आहे. समभाग 320 रुपयांच्या स्तरावर पोहचू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. सध्याच्या भावापेक्षा समभाग 30 टक्के वाढेल असेही म्हटले जात आहे. इटर्नलसोबत अन्य एक कंपनी स्विगीचे समभागही बाजारात वाढलेले दिसले. गुरुवारी समभाग 2 टक्के वाढलेले दिसले. याआधी बुधवारी समभाग 8 टक्के वाढलेले होते. दोन दिवसात स्विगीचा समभाग 11 टक्के वाढलेला दिसला. मॉर्गन स्टॅनले यांनीही या समभागाला ओव्हररेटचे रेटिंग दिले असून 405 रुपयांपर्यंत समभाग वाढू शकतो, असे म्हटले आहे. सध्याला स्विगीचा समभाग 368 रुपयांच्या स्तरावर कार्यरत आहे.