For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच कंपन्यांचे समभाग बाजारात सुचीबद्ध

06:03 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाच कंपन्यांचे समभाग बाजारात सुचीबद्ध
Advertisement

ममता मशीनरीचे समभाग 600  वर लिस्ट :  अन्य चार कंपन्या देखील प्रीमियमवर लिस्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बॉम्बे एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल एक्सचेंज (एनएसई) वर शुक्रवारी पाच कंपन्यांचे समभाग सुचीबद्ध झाले आहेत. यात ट्रांसरेल लाइटिंग लिमिटेड, डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्स लिमिटेड, ममता मशीनरी लिमिटेड, सनातन टेक्सटाईल्स लिमिटेड आणि कॉन्कॉर्ड एनव्हायरो सिस्टम्स लिमिटेड या कंपन्या समाविष्ट आहेत.

Advertisement

  1. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडचा शेअर बीएसई पर इश्यू प्राइस 35.45 टक्के वाढीसह 585.15 रुपए वर सूचीबद्ध झाला. एनएसईवर शेअर इश्यू प्राइस पेक्षा 36.5 टक्के वर 590 रुपयेवर लिस्ट झाला. कंपनीची इश्यू प्राइस 432 प्रति शेअर इतकी होती. या कंपनीने 400 कोटीचे 92,59,259 फ्रेश शेअर इश्यू तयार केले. ऑफर फॉर सेलअंतर्गत 1,01,60,000 इतक्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे.

  1. डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्स लिमिटेड

डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्स लिमिटेडचे शेयर बीएसईवर इश्यू प्राइस पेक्षा 38.83  टक्के तेजीसह 392.90 रुपयेवर लिस्ट झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात एनएसईवर शेअर इश्यू प्राइस 38.87 टक्क्यांच्या वाढीसह 393 रुपयांवर वर सूचीबद्ध झाला. डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्स आयपीओ इश्यू प्राइस 283 प्रति शेअर होती. डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्स आयपीओतून 840.25 कोटी  उभारणार आहे. त्यासाठी कंपनीचे गुंतवणूकदार संपूर्ण 840.25 कोटींचे 2,96,90,900 शेअर इश्यू केले. डॅम कॅपिटल अॅडव्हाइजर्सने आयपीओसाठी एकही फ्रेश शेअर इश्यू केला नाही.

  1. ममता मशीनरी लिमिटेड

ममता मशीनरी लिमिटेडचे शेयर बीएसई वर इश्यू प्राइसपेक्षा 146.91 टक्क्यांवर 600 रुपयावर लिस्ट झाले आहेत. दुसऱ्या बाजूला एनएसईवरही 147 टक्क्यांसोबत 600 रुपयावर लिस्ट झाले. ममता मशीनरीचा आयपीओची इश्यू प्राइस 243 प्रति शेअर होती. आयपीओअंतर्गत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 179.39 कोटीसह 73,82,340 शेअर ऑफर फॉर सेलमार्फत विकले आहेत.

  1. सनातन टेक्सटाइल्स लिमिटेड

सनातन टेक्सटाइल्स लिमिटेडचा शेअर बीएसई वर इश्यू प्राइस 30.5 टक्केवर 419 रुपयावर लिस्ट झाला. तर एनएसईवरही 31.5 टक्क्यांसह 422.30 रुपयांवर सूचीबद्ध झाला. सनातन टेक्सटाइल्सच्या आयपीओची इश्यू प्राइस 321 प्रति शेअर होती. सनातन टेक्सटाइल्सचा इश्यू 550 कोटीचा होता. त्यासाठी कंपनीने 400 कोटींचे 1,24,61,060 फ्रेश शेअर इश्यू केले होते.

  1. कॉन्कॉर्ड एनव्हायरो सिस्टीम्स लिमिटेड

कॉन्कॉर्ड एनव्हायरो सिस्टीम्सचे समभाग बीएसई वर 832 वर सूचीबद्ध झाले, इश्यू किमतीपेक्षा 18.68 टक्क्यांनी वाढले. त्याच वेळी, शेअर 826 रुपयांवर एनएसईवर सूचीबद्ध झाला. इश्यू किंमत 701 प्रति शेअर होती.

Advertisement
Tags :

.