महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बजेटपूर्वी सोमवारी शेअरबाजारात घसरण

06:53 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 103 अंकांनी नुकसानीत, विप्रो, रिलायन्स घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी भारतीय शेअरबाजारात काहीशी निराशा दिसून आली. सेन्सेक्स 103 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला तर दिग्गज रिलायन्सचा समभाग नुकसानीसोबत बंद झाला.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 103 अंकांनी घसरत 80502 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 21 अंकांच्या नुकसानीसह 24509 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, आयटीसी, एसबीआय आणि एचसीएल टेक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेले पाहायला मिळाले. बजेटच्या आधी सलग दोन शेअरबाजाराची सत्रे (शुक्रवार, सोमवार) दबावात दिसली आहेत. जागतिक बाजारातही निराशादायी वातावरण होते. समभागांचा विचार केल्यास बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, एशियन पेंटस्, अॅक्सिस बँक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन आणि अदानी पोर्टस् यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.

हे समभाग तेजीत

तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये 14 समभाग तेजीसह बंद झाले ज्यात एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, टाटा स्टील आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीत होते. यासोबत पॉवरग्रिड कॉर्प, टाटा मोटर्स, सन फार्मा, एल अँड टी, मारुती सुझुकी, इन्फोसिस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि एचयुएल यांचे समभागही नफ्यासह कार्यरत होते.

जागतिक बाजारातही सोमवारी काहीशी निराशा पाहायला मिळाली. आशियाई बाजारात सियोल, टोकियो आणि शांघाई कमकुवत होत बंद झाले. हाँगकाँगचा बाजार तेजीसोबत बंद झाला. दुपारी युरोपचे बाजार काहीशा तेजीसोबत कार्यरत होते. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार घसरणीसोबत बंद झाले होते. जागतिक बाजारात कच्चे तेल म्हणजेच ब्रेंट व्रुड 0.08 टक्के घसरणीसह 82.53 अमेरिकी डॉलर प्रति बॅरलवर राहिले होते.

शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1506 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. शुक्रवारीही शेअरबाजार घसरणीसोबत बंद झाला होता, याआधीच्या चार सत्रात बाजारात चांगली तेजी राहिली होती.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article