For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुवारी शेअर बाजार सपाट स्तरावर बंद

06:56 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुरुवारी शेअर बाजार सपाट स्तरावर बंद
Advertisement

सेन्सेक्स 114 अंकांनी घसरणीत, मिडकॅप-100 निर्देशांकांची 62 हजारांवर झेप, कच्चे तेल घसरले

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई: गुरुवारी भारतीय शेअर बाजारामध्ये मिळताजुळता कल पहायला मिळाला. सकाळी तेजीत असणारा शेअर बाजार अखेरच्या क्षणी काहीसा घसरणीसोबत बंद झाला. दरम्यान निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांकाने 62 हजारावर विक्रमी झेप घेतली होती.

Advertisement

गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 114 अंकांनी घसरत 77844 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजार 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 4 अंकांनी घसरत 24326 अंकांवर बंद झाला. 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक सकाळी 381 अंकांच्या वाढीसह 78339 च्या स्तरावर खुला झाला. निफ्टी निर्देशांकदेखील तेजीसह 24398 अंकांवर खुला झाला होता. 30 कंपन्यांपैकी महिंद्रा आणि महिंद्रा, एनटीपीसी, कोटक बँक, टाटा स्टील आणि इटर्नल यांचे समभाग तेजीमध्ये आघाडीवर होते. या समभागांमध्ये 0.66 ते 2.04 टक्के इतकी तेजी पहायला मिळाली.

या व्यतिरिक्त एशियन पेंटस्, बीईएल, लार्सन आणि टूब्रो, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट व ट्रेंट यांचे समभागही मजबुतीसोबत बंद झाले. दुसरीकडे घसरणीमध्ये पाहता हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, टेक महिंद्रा, टायटन आणि सनफार्मा या समभागांचा समावेश होता. या व्यतिरिक्त आयटीसी, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, इन्फोसिस, एअरटेल, इंडिगो, एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागसुद्धा घसरणीसोबत बंद झाले.

निफ्टी मिडकॅप व स्मॉल कॅप अनुक्रमे 1.20 टक्के, 0.97 टक्के वाढत बंद झाले. विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता कंझ्युमर डुरेबल्स, आयटी आणि एफएमसीजी कमकुवत दिसून आले. निफ्टी ऑटो निर्देशांक मात्र चमकताना दिसला. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली. तेलाचा दर 98 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला होता. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती गुरुवारी 2 टक्क्यांपर्यंत खाली आल्या होत्या.

जागतिक बाजारांमध्ये पाहता मिळताजुळता कल होता. आशियाई बाजारामध्ये जपानचा निक्केई निर्देशांक मोठ्या सुटीनंतर गुरुवारी सुरु झाला. जो चांगल्या तेजीसमवेत कार्यरत राहिला. जवळपास 5 टक्क्यांची तेजी या निर्देशांकाने अनुभवली होती. हाँगकाँगचा हॅगसेंगदेखील तेजीत होता. अमेरिकेतील डो जोन्स अणि एस अँड पी 500 निर्देशांक अनुक्रमे बुधवारी 1.24 टक्के, 1.46 टक्के तेजीसह बंद झाले.

Advertisement
Tags :

.