For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरएफबीएल फ्लेक्सी पॅकचा समभाग सुचीबद्ध

06:22 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरएफबीएल फ्लेक्सी  पॅकचा समभाग सुचीबद्ध
Advertisement

मुंबई :

Advertisement

फ्लेक्सीबल पॅकेजिंग साहित्य बनविणारी कंपनी आरएफबीएल फ्लेक्सी पॅक यांचे समभाग एनएसईएसएमईवर 5 टक्के प्रीमियमसह 52 रुपयांच्या भावांवर सुचिबद्ध झाले आहेत. या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओला गुंतवणूकदारांनी 21 पट बोली लावली होती. 50 रुपयांची इशु किंमत असताना समभाग शेअरबाजारामध्ये 52.50 रुपयांवर मंगळवारी सुचीबद्ध झाला. 5 टक्क्यांपर्यंत परतावा गुंतवणूकदारांना प्राप्त करता आला. याचवेळी इंट्राडेमध्ये समभाग 55 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 35 कोटी रुपयांचा हा आयपीओ 12 ते 14 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या आयपीओला पात्रता धारक, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 124 पट, बिगर संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी 24 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 11 पट प्रतिसाद दिला. समभागांच्या माध्यमातून उभारलेले पैसे भांडवली खर्चासाठी 12 कोटी रुपये वापरले जाणार आहेत. कामकाजी भांडवालासाठी 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.