शार्दुल ठाकूरला रणजी सामना हुकणार
06:11 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, मुंबई
Advertisement
2026-27 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत येथे 2 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या इलाईट ड गटातील रेल्वे विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू शार्दुल ठाकूर उपलब्ध होऊ शकणार नाही.
या स्पर्धेतील मुंबई संघाचे उर्वरित सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविले जाणार आहे. शार्दुल ठाकूरला दुखापत झाली असून ती पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान दोन आठवड्यांची गरज आहे. आता ड गटात मुंबई संघाने सलग तीन सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले आहे. मुंबई संघाचे नेतृत्व सिद्धेश लाडकडे सोपविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
