महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शार्दुल ठाकूर एकटा तामिळनाडूला भिडला

06:45 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शार्दुलचे शानदार शतक : तनुष कोटियानच्या नाबाद 74 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

रणजी ट्रॉफीची सेमीफायनल लढत मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात बीकेसी येथील मैदानावर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या तामिळनाडूने 146 धावा केल्या. फलंदाजीला आलेल्या मुंबईचा पहिला डाव देखील कोसळला. पण नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॉर्ड शार्दूल ठाकूरने अशी कमाल करून दाखवली ज्याचा कोणी विचार केला नव्हता. शार्दूलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. शार्दुलच्या या खेळीने मुंबईचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी आघाडी देखील मिळवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 9 बाद 353 धावा केल्या होत्या. मुंबईकडे आता 207 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस तनुष कोटियन 74 व तुषार देशपांडे 17 धावांवर खेळत होते. रणजी चषकातील या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर तामिळनाडूचा पहिला डाव 146 धावांवर संपला. यानंतर पहिल्या दिवशी यजमान मुंबईने 2 बाद 45 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन मुंबईने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. दिवसातील पहिल्याच षटकात मोहित अवस्थीला (2 धावा) साई किशोरने बाद करत तामिळनाडूला पहिले यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. त्याची अपयशी कामगिरी उपांत्य सामन्यातही कायम राहिली. 67 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. रहाणेने 2 चौकार मारले. फॉर्ममध्ये असलेल्या मुशीर खानने अर्धशतक झळकावले. त्याने 131 चेंडूंचा सामना करताना 6 चौकारासह 55 धावा केल्या.

श्रेयस अय्यर फ्लॉप, शार्दुलचा शतकी धमाका

कर्णधार रहाणे बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर फ्लॉप ठरला. श्रेयस अय्यरकडून सगळ्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र 3 धावा करून तो बाद झाला. संदीप वारियरने एका शानदार चेंडूवर अय्यरला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस बाद झाल्यानंतर मुशीर खान (55) व शम्स मुलाणी पाठोपाठ बाद झाल्याने मुंबईची 7 बाद 106 अशी बिकट स्थिती झाली होती. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरने हार्दिक तोमरला सोबतीला घेत किल्ला लढवला. या जोडीने आठव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी साकारली. तोमोरने 3 चौकारासह 35 धावा केल्या. तोमोरला साई किशोरने बाद केले. हार्दिक बाद झाल्यानंतर शार्दुलच्या फलंदाजीत फारसा फरक पडला नाही आणि त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. शार्दूलने 105 चेंडूत 103.81 च्या स्ट्राइक रेटने 109 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. शतकानंतर मात्र तो बाद झाला. तत्पूर्वी, शार्दुलने तनुष कोटियनसोबत नवव्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी साकारली. शार्दुल बाद झाल्यानंतर दिवसअखेरीस तनुष कोटियन व तुषार देशपांडे यांनी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कोटियनने 10 चौकारासह नाबाद 74 तर तुषारने 2 चौकारासह नाबाद 17 धावांवर खेळत आहेत. मुंबईने 100 षटकांत 9 बाद 353 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 207 धावांची आघाडी आहे. तामिळनाडूकडून साई किशोरने सर्वाधिक 6 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू पहिला डाव 146 मुंबई पहिला डाव 100 षटकांत 9 बाद 353 (मुशीर खान 55, हार्दिक तोमोर 35, शार्दुल ठाकुर 105, तनुष कोटियन खेळत आहे 74, तुषार देशपांडे खेळत आहे 17, साई किशोर 97 धावांत 6 बळी, कुलदीप सेन 2 बळी).

शार्दुल ठाकूरचे कारकिर्दीतील पहिले शतक

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उंपात्य फेरीतील निर्णायक सामन्यात शार्दूल ठाकुरने धमाकेदार शतक ठोकले. बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर तामिळनाडूविरुद्ध लढतीत त्याने 105 चेंडूत 109 धावांची तुफानी खेळी साकारली. विशेष म्हणजे, शार्दुलने 81 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर तामिळनाडूच्या बाबा इंद्रजीतच्या बॉलिंगवर पुढे येत खणखणीत सिक्स खेचला आणि अवघ्या 89 चेंडूत कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. शार्दुलच्या या धमाकेदार खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईने दुसऱ्या दिवसअखेरीस तब्बल 207 धावांची आघाडी मिळवली. शार्दुलचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच शतक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article