Kolhapur Municipal Corporation Election : कोल्हापूर महापालिकेत शारंगधर देशमुख यांचा विजय, काँग्रेसला धक्का
शारंगधर देशमुखांची सरशी, राहुल माने पराभूत
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वात जास्त राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकापेक्षा एक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवार निवडून यावी यासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर असो अथवा आमदार सतेज पाटील यांचे नाव असो..
ऋतुराज क्षीरसागर यांचा दणदणीत विजय
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलगा ऋतुराज क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता त्यामुळे राजेश क्षीरसागर यांनी प्रचाराचे धडाका लावला होता, यासाठी स्वत : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी आले होते, खरे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्या शिंदे गटाच्या उमेदवासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरले होते पण याचा सर्वाधिक जास्त फायदा हा ऋतुराज क्षीरसागर यांना झाल्याचा दिसून आला.. ऋतुराज क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार विजय साळोंखे यांना हरवत दणदणीत विजय मिळवला..
आ. सतेज पाटील यांना झटका
तर दुसरीकडे हायव्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख आणि कॉँग्रेस उमेदवार राहुल माने यांच्यात सुरू होती. पण शारंगधर देशमुख यांनी राहुल माने पराभव करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना हा झटका आहे.
शारंगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशमुख यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने म्हणजेच सतेज पाटील यांच्याकडून कंबर कसली होती. मात्र, तुल्यबळ लढतीमध्ये राहुल माने यांचा शारंगधर देशमुख यांनी पराभव केला.त्यामुळे हा त्यांचा मोठा विजय मानला जात आहे.