For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र महाबळ यांचे निधन

बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र महाबळ यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी | वार्ताहर : बांदा-पानवळ येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नाबर हायस्कूलचे सचिव, तसेच बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र धोंडीराम महाबळ (वय ७५) यांचे निधन झाले. महाबळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. सन १९८९ मध्ये अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभर राबविण्यात आलेल्या 'रामशिला पूजन' आणि 'शिला संकलन' अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Advertisement

शिक्षण क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावली. नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भेडशी, कुडासे, कोलझर, डेगवे आणि मडुरा येथील शाळांमध्ये त्यांनी अध्यापन केले. ते इंग्रजी विषयाचे अभ्यासू व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. डेगवे व बांदा हायस्कूलमध्ये त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तसेच, विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षणही ते देत असत.

महाबळ हे मूळचे गाळेल गावचे रहिवासी होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, शांत आणि सर्वसमावेशक होता. त्यांनी कधीही जातिभेद मानला नाही. सर्व समाजघटकांशी तसेच विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध होते.

Advertisement

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि अन्य परिवार असा मोठा परिवार आहे. विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाण असलेल्या शिक्षकाला आपण मुकलो असल्याची भावना शेतकरी फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.