For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरद पवार यांची समरजीत घाटगेंच्या निवासस्थानी भेट! पक्षप्रवेशाच्या पार्श्वभुमीवर घेतली कुटुंबियांची भेट

01:40 PM Sep 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
शरद पवार यांची समरजीत घाटगेंच्या निवासस्थानी भेट  पक्षप्रवेशाच्या पार्श्वभुमीवर घेतली कुटुंबियांची भेट
Advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरात शाहू सहकाऱी कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आज भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून त्या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी घाटगे कुटुंबियांची भेट घेतली.

Advertisement

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=kGoDqo82DHE[/embedyt]

जेष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यामध्ये त्यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यावर भर दिला असून आज त्यांनी शाहू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Advertisement

यापुर्वी भाजपचे जिल्हाध्यक्षपद सांभाळलेल्या समरजीत घाटगे यांनी विधानसभेच्या बदलत्या राजकिय पार्श्वभुमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि आपल्या कार्यकत्यांचा मेळावा घेऊन तुतारी हातात घेण्यासंदर्भात चाचपणी केली होती. त्यानंतर ३ तारखेला त्यांचा पक्षप्रवेश नक्की झाला होता. त्या पार्श्वभुमीवर पक्षाचे नेते शरद पवार यांनी घाटगे कुटुंबियांची भेट घेतली. समरजीत घाटगे यांच्या नागाळा पार्कातील बंगल्यावर आज सकाळी शरद पवार पोहोचले. प्रविणसिंह घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी समरजीत घाटगे यांच्या आई सुहासिनी घाटगे, पत्नी निवेदिता घाटगे उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.