केशवराव भोसले नाट्यगृहाला शरद पवारांची भेट ! नविन नाट्यगृहासाठी १ कोटीच्या निधीची घोषणा
माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे कोल्हापूर दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. मागल्या महिन्यात आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या ऐतिहासिक नाट्यगृहाला उर्जित अवस्था मिळावी यासाठी त्यांनी १ कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले.
शरद पवार हे दोन-तीन दिवस कोल्हापुरात आहेत. आपल्या या दौऱ्यात त्यांनी राजकीय समीकरणे मांडताना केशवराव भोसले नाट्यगृहालाही भेट दिली. केशवराव भोसले नाट्यगृह गेल्या महिन्यात आगीच्या भक्षस्थानी सापडले. कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या या नाट्यगृह जळाल्याने सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली.
दरम्यान, शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा ठरल्यावर त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी जळालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. त्यांच्याबरोबर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना घटनेची माहिती देताना नवीन नाट्यगृह उभारले जात असल्याची कल्पना दिली. यावेळी अनेक नाट्यप्रमींनी केशवराव भोसले नाट्यगृहाकडे धाव घेऊन शरद पवार यांना आपल्या व्यथा मांडल्या. तसेच दर्जेदार नाट्यगृह लवकरात लवकर उभा राहण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहातील आठवणींना उजाळा दिला. तसेच हे नाट्यगृह पुन्हा उभे राहीलं पाहीजे अशी इच्छा व्यक्त केली. जे नविन नाट्यगृह नवीन उभारणार आहे ते चांगलंच झालं पाहिजे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी आपल्या खासदार फंडातून एक कोटीचा निधी जाहीर केला. तसेच लोकप्रतिनिधींना ही आवाहन केले की त्यांनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सढळ हाताने मदत करावी.