For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात शनिवारी ‘आक्रोश मोर्चा’

12:27 PM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात शनिवारी ‘आक्रोश मोर्चा’
Advertisement

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पावसाअभावी खरीप पिके जळून गेली आहेत. उसाची वाढ खुंटली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) पंढरपुरात शेतकरी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे.

Advertisement

मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी पंढरपुरात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, शशिकांत शिंदे, धैर्यशील मोहिते-पाटील, विविध आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हजारो शेतकरीही मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. तसेच सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी श्री विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.