कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : शरद पवारांनी केली राजकीय चाचपणी; मनपातील घडामोडींचा घेतला अंदाज

05:50 PM Nov 19, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                सोलापूर मनपा निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीची चाहूल

Advertisement

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याविषयी सुतोवाच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याच्या दरम्यान याची चाचपणी झाली.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्या दौऱ्यामध्ये कोणत्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वच पक्षातील नेत्यांचा भाजपकडे कल वाढला आहे. अशावेळी पवार हे कोणत्या खेळी करणार, भाकरी फिरविण्यासाठी नव्या दमाच्या नेत्यांना पॉवर देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या 'जनवात्सल्य' बंगल्यावर चर्चा केली. त्यानंतर एका लग्न समारंभात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पवारांसोबत चर्चा केली.

शरद पवार यांनी या धावत्या दौऱ्यात पक्षाचा शहराध्यक्ष बदलल्यानंतर जी परिस्थिती आहे याबद्दलची माहिती भारत जाधव यांच्याकडून घेतली. मनपा निवडणुकीचा अंदाज घेण्यात आला. शरद पवार माझे नेते आहेत. त्यांचा अजूनही मला धाक आहे. आमच्यात वेगळे काही नसते,अशी मिस्कील टिप्पणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

महापालिकेत मी ठरविलेले महापौर, सभागृह नेते त्यावेळी कर्तृत्ववान ठरले, असे मत शरद पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. आम्ही दोघांनी एकत्र काम केले. मी कधी बोलतो का, त्यांनी आम्हाला कधी काही केले नाही म्हणून? पक्षात मतभेद होतात, पण दोघेही एकत्र आहोत, असेही सुशीलकुमार शिंद म्हणाले. शिंदेंचे हे वक्तव्य राजकीयदष्ट्या महत्वाचे असून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महापालिका निवडणूकीत होण्याचे अप्रत्यक्ष संकेत या वक्तव्यांमधून मिळत आहेत. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची शरद पवार यांच्याबरोबर झालेली चर्चाही महत्वपूर्ण असून धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी भाजपविरोधात आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकते अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#CongressNCPAlliance#congressnews#MunicipalElections#OppositionUnity#politicalupdates#sharadpawar#SolapurPolitics#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaSharad Pawar Solapur visit
Next Article