For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरद पवारांच्या प्रकृतीची नेत्यांकडून विचारपूस; ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल, विश्वजीत कदम यांनी घेतली भेट

09:46 PM Nov 05, 2026 IST | ABHIJEET RANJANE
शरद पवारांच्या प्रकृतीची नेत्यांकडून विचारपूस  ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल  विश्वजीत कदम यांनी घेतली भेट
Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू आहेत. 

खोकल्याचा त्रास होत असल्याने शरद पवार यांना यापूर्वी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काही तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

Advertisement

प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची माहिती घेतली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात असून, अनेक नेते त्यांच्या तब्येतीची माहिती घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.