टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद गांगल, उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी
ठाणे : नागरी सहकारी क्षेत्रात अग्रणी असलेल्या, वीस हजार कोटींची उलाढाल असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ये÷ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर रोजी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत सदर नियुक्तीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष विवेकानंद पत्की यांच्याकडून शरद गांगल यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
टीजेएसबी बँकेचे ज्ये÷ संचालक शरद गांगल उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून टीजेएसबी बँकेत 17 वर्षे ते कार्यरत आहेत. वाणिज्य कायद्याचे पदवीधारक असलेले शरद गांगल मानव संसाधन आणि व्यवस्थापनाचे जाणकार आहेत. शरद गांगल यांनी भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योग समूहात विविध उच्च पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. ठाण्याचे रहिवासी असलेले शरद गांगल औद्योगिक, व्यवसायिक संस्था, भारतीय आणि विदेशी विद्यापीठ येथे तज्ञ व्याख्याते म्हणून जातात. बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक असलेले शरद गांगल सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य बँक प्रको÷ प्रमुख आहेत.
उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले वैभव सिंघवी हे सनदी लेखापाल आहेत. गेली पंचवीस वर्ष ते एक प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसाय करत आहेत. कर प्रणाली, लेखापरिक्षण यातील जाणकार असलेले वैभव सिंघवी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
टीजेएसबी सहकारी बँक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे 136 शाखातून कार्यरत आहे. बँकेने पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत. तंत्रज्ञान पूरक ग्राहक सेवा हे बँकेचे वैशिष्टय आहे.