टाटा सन्सच्या सूचीकरणास शापूरजी मिस्रीचा पाठिंबा
शापूरजी समूहाची टाटा सन्समध्ये सुमारे 18 टक्के हिस्सेदारी
त. भा. वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शापूरजी पालोनजी (एसपी) ग्रुपचे अध्यक्ष शापूरजी पालोनजी मिस्त्राr यांनी पुन्हा एकदा टाटा सन्सच्या सूचीकरणाचे समर्थन केले आहे. शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात मिस्री म्हणाले की, टाटा सन्सला शेअर बाजारात सूचीबद्ध करणे आवश्यक आहे. यामुळे ग्रुपमधील पारदर्शकता तर वाढेलच, पण सुशासन आणि उत्तरदायित्वही मजबूत होईल. शापूरजी पालोनजी ग्रुपची टाटा सन्समध्ये सुमारे 18 टक्के हिस्सेदारी आहे.
सार्वजनिक सूचीकरणामुळे टाटा ट्रस्ट्सना फायदा होईल. शापूरजी मिस्री म्हणाले की, टाटा सन्सचे सूचीकरण केवळ कायदेशीर आवश्यकता पूर्ण करण्यापुरते मर्यादित नाही, तर ते टाटा ग्रुपच्या मूलभूत तत्त्वांना अधिक मजबूत करेल. त्यांनी असा युक्तिवाद केला की, सार्वजनिक सूचीकरणामुळे टाटा ट्रस्ट्सच्या हिताला बाधा पोहोचेल किंवा त्यांच्या सार्वजनिक कल्याणकारी कार्यांमध्ये घट होईल, हे दर्शवणारे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.
आमच्या गुंतवणूकदारांना, भागधारकांना फायदा
मिस्त्राr यांच्या मते, टाटा सन्सच्या सूचीकरणामुळे संचालक मंडळाचे उत्तरदायित्व वाढेल आणि गुंतवणूकदारांचा आधारही वाढेल. त्यांनी यावर जोर दिला की, यामुळे लाखो किरकोळ भागधारकांसाठी मूल्याचे दरवाजे उघडतील. याशिवाय, हे टाटा ट्रस्ट्ससाठी लाभांशाचा एक स्थिर आणि भक्कम स्रोत बनेल, ज्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठीच्या परोपकारी कार्यांना आणखी चालना मिळेल.