For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबरकडून शांतीकुमार चारीमुंड्या चीतपट

10:05 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाबरकडून शांतीकुमार चारीमुंड्या चीतपट
Advertisement

कार्तिक काटेचा अमितकुमारवर प्रेक्षणीय विजय : 20 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांची हजेरी

Advertisement

बेळगाव : तिर्थकुंडये येथील रामलिंग देवस्थान कमिटी आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानात प्रमुख कुस्ती विजय बाबरने शांतीकुमारला 8 व्या मिनिटाला घुटना लावून उलटी मारून चारीमुंड्या चीत केले तर कार्तिक काटेने अमितकुमार दिल्लाचा 7 व्या मिनिटाला खालून डंकी मारत लपेट डावावरती प्रेक्षणीय विजय मिळवून उपस्थित 20 हजार हून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली. सायंकाळी 9 वा. प्रमुख कुस्ती खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, तिर्थकुंडये कुस्तीगीर संघटनेच्यावतीने विजय बाबर व शांतीकुमार पंजाब यांच्यात लावण्यात आली. हि कुस्ती किरण भगत बरोबर होती पण किरण भगत वैयक्तिक कारणामुळे येऊ शकला नाही. तिसऱ्या मिनिटाला विजय बाबरने हप्ते भरून शांतीकुमारला खाली घेत एकलांगी भरून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या शांतीकुमारने आपल्या अनुभवच्या जोरावर त्यातून सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला एकेरीपट काढत शांतीकुमारने विजय बाबरला खाली घेत एकचाक मारून चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण चपळ असलेल्या विजय बाबरने त्यातून सुटका करून घेतली. सहाव्या मिनिटाला विजय बाबरने मच्छीगोदाचा प्रयत्न केला. त्यातून शांतीकुमारने सावरून घेतले. आठव्या मिनिटाला एकेरीपट काढून विजय बाबरने शांतीकुमारवर कब्जा मिळवित मानेचा कस काढीत घुटणा लावून उलटी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळवित. वाव मिळविली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती समालोचक कृष्णकुमार चौगुले राशिवडे, पत्रकार उमेश मजुकर, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, विलास कवठणकर व कुस्तीगीर संघटनेच्या हस्ते कर्नाटक केसरी कार्तिक काटे व अमितकुमार दिल्ली ही कुस्ती लावण्यात आली. पहिल्याच मि. ला अमितकुमारने एकेरीपट काढुन कार्तिक काटेला खाली घेत दोन्ही पायाला एकलांगी भरून चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कुस्ती निकाल होणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी कार्तिकने खालून पुट्टी मारून अमितकुमारवर कबजा मिळविला. पण चपळाईने अमितने त्यातून सुटका करून घेतली. 4 मि. ला. पायाला अकडी लवत अमितने कार्तिकला पुन्हा खाली घेतले. यावेळी मात्र कार्तिक पराभव होतो काय असे वाटत होते. कारण अमितने पुन्हा दोन्ही पायाला एकलांगी भरून जोरदार प्रयत्न केला. पण डावात खासीयत असलेल्या कार्तिकने खालून डंकी मारून लपेट डावावरती 7 व्या मि. चित करून उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बशीडोणी व महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण ही कुस्ती तिर्थकुंडे भजनी मंडळाच्याहस्ते लावण्यात आली. दुसऱ्या मिनीटाला उमेश चव्हाणने एकेरीपट काढून झोळी बांधून नागराज बशीडोणीला जोरदार धडक देत चित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागराज बशीडोणीच्या गंभीर दु:खापत झाल्याने उमेश चव्हाणला विजयी घोषित केले.

Advertisement

चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कंग्राळीने राकेशकुमार दिल्लीला एकेरीपट काढून खाली घेत एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न केला. पण राकेशने त्यातून सुटका करून घेतली. 4 मि. ला रोहित कंग्राळीने राकेशकुमारला हप्ते डावावर चीत केले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत गुद्याप्पा दावणगिरी व पार्थ पाटील कंग्राळी यांच्यात अटितटीची कुस्ती झाली. गुद्याप्पा दावणगिरीने एकचाक डावावरती पार्थवर विजय मिळविला. 6 व्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडेने राज पवार सांगलीचा छडीटंग डावावरती विजय मिळविला. 7 क्रमांकाच्या कुस्तीत दिल्लीच्या समेशरने रूपेश कर्लेचा घिशा डावावरती पराभव केला. 8 व्या क्रमांकाची कुस्ती प्रथमेश कंग्राळी व ओंमकार पाटील राशिवडे ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. 9 क्रमांकाच्या कुस्ती निशांत पाटील राशिवडेने सुरज कडोलीचा एकचाकीवर विजय मिळविला. 10 क्रमांकाच्या कुस्तीत शंकर तिर्थकुंडेने रोहितचा उलटी डावावर पराभव केला. अजित कंग्राळीने भिमशी काटेचा एकलांगीवरती, सिध्दार्थ तिर्थकुंडेने केशव सांबराचा छडीटांगेवर, तेजम लोहार राशिवडेने, रोहन कडोलीचा हप्ते डावावरती, ओंम कंग्राळीने शिवम मुतगाचा एकचाकीवर, महांतेश संतीबस्तवाडने ओंमकार सांवगावचा छडीटांगेवर, ओंमकार संतीबस्तवाडने करण खादरवाडीचा झोळी तर हर्ष कंग्राळीने राहुल किणयेवर मोळी डावावर प्रेक्षणीय विजय मिळविले.

मेंढ्याच्या झालेल्या कुस्त्यातून गुद्याप्पा दावणगिरीने पार्थ पाटीलचा, विनायक यळ्ळूरने कुबेर पिरनवाडीचा घश्यावरती, हरीश तिर्थकुंडेने श्रीकांत शिंदोळीचा एकलांगीवर विरेश सांगावने रोहित तळवारचा पराभव करून मेंढ्याचे बक्षिस पटकाविले. त्यांना मेंढ्याचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या कुस्तीत प्रशांता खादरवाडीने प्रांजल किणये धाकेवरती पराभव केला. तर राधीका संतीबस्तवाडने सानिका पाटीलचा पराभव करून विजय संपादन केला. प्रारंभी आखाड्याचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, किशोर देशपांडे, रामलिंग फोटोचे पूजन रमेश नाईक यांनी केले. रामलिंग देवाचे पूजन किशोर देशपांडे व प्रमोद कोचेरी यांनी केले. मैदानासाठी पंच म्हणून लक्ष्मण बामणे, नवीन मुदगे, राजु कडोली, बाबु कल्लेहोळ, शंकर पाटील, नारायण मुंचडी, प्रकाश तुर्केवाडी, वसंत बनकर, पिराजी मुंचडीकर, सुधीर बिर्जे, शिवाजी पाटील, प्रकाश तारीहाळकर व आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. कुस्ती समालोचन कुष्णराज चौगुले राशिवडे, राजु मुंचडीकर यांनी सर्व कुस्ती शौकींनाना आपल्या कुस्तीच्या ठेक्यात वर्णन केले. दिपक अवटे यळगूड यांच्या सहकाऱ्याने आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले.

Advertisement
Tags :

.