थ्रिलरपटात दिसून येणार शनाया
आदर्श गौरवसोबत सुरू केले चित्रिकरण
बॉलिवूडला आता एक नवी जोडी पहायला मिळणार आहे. आदर्श गौरव आणि शनाया कपूर यांनी ‘तू या मैं’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजॉय नांबियार करत आहे. आदर्श गौरव अणि शनायाच्या या चित्रपटाचा टीजर यापूर्वी प्रदर्शित झाला असून यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
आदर्श हा ‘द व्हाइट टायगर’, ‘खो गए हम कहां’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. तर ‘तू या मै’ या चित्रपटात तो एका छोट्या शहरातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची भूमिका साकारणार्रां आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. याचे चित्रिकरण सुरू झाले आहे. माझ्या मागील भूमिकांपेक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी आहे, याचमुळे या कथेबाबत माझे आकर्षण वाढले आहे. बिजॉय नांबियारसारखा अनोखा दिग्दर्शक आणि शनायासोबत काम करता येणार असल्याने हा अनुभव मजेशीर ठरेल असे आदर्शने म्हटले.
‘तू या मैं’ हा सायकोलॉजिकल सर्वाइवल थ्रिलर चित्रपट असून तो रोमान्ससोबत भय अन् जीवनातील संघर्ष नव्या पद्धतीने दाखविणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांची प्रॉडक्शन कंपनी कलर येलो प्रॉडक्शन्सकडून केली जात आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.