For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार शनाया

06:28 AM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार शनाया
Advertisement

तेजा सज्जाचा ‘झॉम्बी रेड्डी’ चित्रपट

Advertisement

दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाचा चित्रपट ‘झॉम्बी रेड्डी’च्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. चित्रपटात तेजासोबत एक बॉलिवूड अभिनेत्रीही दक्षिणेत पदार्पण करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात शनाया कपूरची वर्णी लागली आहे. चित्रपटात उपेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

झॉम्बी रेड्डी 2 हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळी, नेपाळीसोबत जपानी भाषेत प्रदर्शित होणार आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. शनाया यापूर्वी ‘तू या मैं’ या चित्रपटात दिसून आली होती. बिजॉय नांबियारच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. तर शनाया त्यापूर्वी मागील वर्षी विक्रांत मैसीसोबत ‘आंखो की गुस्ताखियां’ चित्रपटात दिसून आली होती.

Advertisement

‘झॉम्बी रेड्डी 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा करणार आहे. हा चित्रपट एक हाय ऑक्टेन झॉम्बी अॅक्शन कॉमेडीपट असेल. यापूर्वी सुपर्णने ‘द फॅमिली मॅन’, ‘राणा नायडू’ आणि ‘हक’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन पेले आहे. तर चित्रपटाची कहाणी प्रशांत वर्मा यांनी लिहिली आहे. तर संगीत गौरा हरि यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

Advertisement
Tags :

.