For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाक्षिणात्य चित्रपटात शनाया कपूर

06:22 AM Jul 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
दाक्षिणात्य चित्रपटात शनाया कपूर
Advertisement

चित्रपटसृष्टीत स्टार किड्स असूनही स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. याप्रकरणी अभिनेता संजय कपूरची कन्या शनायाचे नाव घेतले जाऊ शकते. शनाया आता बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्यावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली आहे.

Advertisement

शनायाची चुलत बहिण जान्हवी कपूरने यापूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार आहे. शनाया ही तेलगू सुपरस्टार तेजा सज्जाचा आगामी चित्रपट ‘झॉम्बी रेडी 2’मध्ये दिसून येणार आहे.

झॉम्बी रेडी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. निर्माते आता याचा सीक्वेल घेऊन येणार आहेत. यात मुख्य कलाकार म्हणून तेजा सज्जा आणि शनाया यांची निवड करण्यात आली आहे. शनाया या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. यापूर्वी मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांच्या वृषभ चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे तिला तो गमवावा लागला होता.

Advertisement

शनाया कपूरने आंखो की गुस्ताखियां चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर ती ‘तू या मैं’ या चित्रपटात ती दिसून आली होती. परंतु हा चित्रपट देखील अपयशी ठरला होता.

Advertisement

.