‘तू या मैं’मध्ये शनाया
बॉलिवूडमध्ये स्वत:च्या पदार्पणासाठी तयार शनाया कपूरचा आगामी चित्रपट ‘तू या मैं’चा टीझर जारी झाला आहे. या चित्रपटात शनायासोबत आदर्श गौरव हा दमदार अभिनेता दिसून येणार आहे. हा सर्वाइवर थ्रिलर चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा टीझर जारी करत शनायाने ‘प्रेम, दहशत आणि हे एकत्र, अत्यंत चुकीचे झाले’ असे नमूद केले आहे. बेजॉय नांबियारकडून दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर भीतीदायक वातावरण असलेल्या बॅकवॉटरमध्ये समोर येतो, जेथे एक युवक-युवती पाण्यात उतरतात रोमांससाठी परंतु अचानक पूर्ण कहाणी बदलून जाते, सर्व भावना बदलून जातात असे दिसून येते. हा टीझर रोमांस आणि रोमांचसोबत हृदयाचे ठोके वाढविणारा आहे.
या चित्रपटाची कहाणी अभिषेक बांदेकर यांनी लिहिली असून या चित्रपटासाठी आनंद एल. राय यांची प्रॉडक्शन कंपनी कलर येलो आणि बेजॉय नांबियार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. शनायाने अलिकडेच स्वत:चा चित्रपट ‘आंखो की गुस्ताखियां’चे चित्रिकरण पूर्ण पेले आहे. या चित्रपटात ती विक्रांत मैसीसोबत दिसून येणार आहे. तर आदर्श गौरव अलिकडेच प्रदर्शित ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’मध्ये दिसून आला आहे.