For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तू या मैं’ मध्ये शनाया

06:08 AM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘तू या मैं’ मध्ये शनाया
Advertisement

दिग्दर्शक बेजॉय नाम्बियारचा आगामी सर्वाइवल थ्रिलर चित्रपट ‘तू या मैं’चा प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात आदर्श गौवर आणि शनाया कपूर अशा इन्फ्लुएंसरची भूमिका साकारत आहेत, जे एका रक्तपिपासू मगरीच्या तावडीत सापडतात. लोकांना हा ट्रेलर पसंत पडला आहे. शनाया यात ‘मिस वॅनिटी’ तर  आदर्श हा नालासोपऱ्यातील एक क्रिएटर ‘ए’च्या भमिकेत आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून येणाऱ्या या दोन इन्फ्लुंएसरांच्या दोन वेगवेगळ्या जगताला दर्शविणारा आहे.

Advertisement

ए आणि मिस वॅनिटीचा वायरल कंटेंट आणि जोखिमयुक्त स्टंट करण्याचा ध्यास एका भयानक स्वप्नात बदलतो. ते रक्ताने माखलेल्या एका रिकामी स्विमिंग पूलमध्ये उतरतात. रोमांचाने भरपूर स्टंट करण्याची इच्छा जगण्यामरण्याच्या लढाईत रुपांतरित होते. वेगळे अन् कमकुवत झालेले हे दोन्ही एका घातक मगरीसोबतच्या संघर्षात अडकून पडतात. ट्रेलरमध्ये आदर्श आणि शनाया यांचा पळण्याचा प्रयत्न दाखविण्यात आला असून यात ते काच तोडताना आणि पाण्याने भरलेल्या भुयारांमधून जात पूलाबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.  अन्य दृश्यात शनाया साकारत असलेली व्यक्तिरेखा वेदनेने ओरडत असताना आणि मगर तिला खेचून नेत असल्याचे दिसून येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.