For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वेबसीरिजमध्ये शनाया मुख्य भूमिकेत

06:39 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेबसीरिजमध्ये शनाया मुख्य भूमिकेत
Advertisement

स्टुडंट ऑफ द ईयर-आफ्टर डार्क येणार

Advertisement

स्टुडंट ऑफ द ईयरच्या मागील चित्रपटांमध्ये कॉलेज लाइफ, मैत्री, प्रेम, आकर्षक पार्टी आणि ग्लॅमरची झलक दिसून आली होती. परंतु ‘स्टुडंट ऑफ द ईयर : आफ्टर डार्क’मध्ये कहाणीचा वेगळा अंदाज दिसून येणार आहे. यावेळी कहाणी मोठ्या पडद्यावर नव्हे तर वेबसीरिजद्वारे दाखविण्यात येणार आहे.

या सीरिजमध्ये ग्लॅमर आणि कॉलेज लाइफसोबत एक डार्क कहाणीही पहायला मिळेल. निर्मात्यांनी या सीरिजची घोषणा केली आहे. याचे नाव ‘स्टुडंट ऑफ द ईयर : आफ्टर डार्क’ ठेवण्यात आले आहे. तर शनाया कपूर या सीरिजद्वारे ओटीटीच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. या सीरिजचा टीझर निर्मात्यांनी जारी केला आहे. सीरिजच्या टीझरच्या सुरुवातीला पार्टी अन् मस्तीने भरलेले जग दिसते. परंतु लवकरच कहाणी नवे वळण घेते आणि एका युवतीचा मृतदेह दिसून येतो. टीझरचे हे दृश्य यावेळी कहाणीत रहस्य, रोमांच आणि अनेक अनुत्तरित प्रश्न पहायला मिळू शकतात हे दर्शवितो.

Advertisement

या वेबसीरिजची निर्मिती करण जौहर करणार आहे. तर दिग्दर्शन रीमा माया करणार आहे. सध्या या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख आणि उर्वरित कलाकारांची माहिती समोर आलेली नाही.

Advertisement
Tags :

.