शनायाला मिळाला आणखी एक चित्रपट
अभय वर्मासोबत करणार काम
संजय कपूरची मुलगी शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला आता एका मागोमाग एक प्रोजेक्ट मिळत आहेत. ‘आंखो की गुस्ताखियां’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. शनाया आता स्वत:च्या दुसऱ्या चित्रपटाची देखील तयारी करत आहे. एका रोमांस चित्रपटात शनाया ही अभय वर्मासोबत काम करणार आहे.
दिग्दर्शक शुजात सौदागर या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. शनायाने चित्रपटासाठी झालेल्या तीन महिन्यांच्या कार्यशाळेतही भाग घेतला आहे. शनायाने ’गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’मध्ये सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत होती. शनाया ही तमिळ-मल्याळी चित्रपट ‘वृषभ’मध्येही दिसून येणार आहे. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात सलमा आगा यांची मुलगा जहरा एस. खान आणि रोशन मेका देखील दिसून येणार आहे. शनायाने यापूर्वी करण जौहरचा चित्रपट बेधडकच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. परंतु हा चित्रपट काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकलेला नाही.