Satara : महाबळेश्वरमध्ये अस्वच्छतेवरून 'झाडाझडती'; नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून शहरात पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात
महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सुनील शिंदे यांनी शहर स्वच्छतेच्या सुस्तपणाला चाप लावत शहराच्या स्वच्छतेचा आणि अतिक्रमणाचा प्रश्न हाती घेतला आहे. पदभार स्वीकारून अवघे काही दिवस उलटत नाही तोच, नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
छ. शिवाजी महाराज चौकातून स्वछता मोहिमेची सुरुवात सकाळी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवकांच्या टीमने शहरातील मुख्यकेंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची अचानक पाहणी केली. यावेळी या परिसरातील अस्वच्छता आणि वाढलेल्या अतिक्रमणांचे भीषण स्वरूप पाहून लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेषत ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था पाहून नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत व्यवसायचे जाळे विणले गेले असून, त्यामुळे पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय, रस्त्याच्या कडेला महिनोंमहिने उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी संपूर्ण शहर परिसरात तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचरामुक्त शहर करावे. रस्त्यावर आणि बेकायदेशीररीत्या पार्क केलेली आणि दीर्घकाळ उभी असलेली वाहने त्वरीत हटवावीत, अशा सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान नगरसेवक अफझल सुतार यांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे