For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : मंत्री, आमदारांची कामे बाजूला ठेवा

12:51 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   मंत्री  आमदारांची कामे बाजूला ठेवा
Advertisement
                                               पहिलं काम सैनिक व त्यांच्या परिवाराचे करा 
आनेवाडी : देशभक्तीच्याच भावनेने जवान सैन्य दलात भरती होत असतो त्याच जाणिवेतून माजी सैनिक कल्याण खात्यातील व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी देखील पुढाऱ्यांची कामे बाजूला ठेवून पहिले काम सैनिक व सैनिक परिवारांची केली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी सैनिक कल्याण खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा येथे जयहिंद फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद सैनिक परिवार कृतज्ञता व विधवा प्रथम मुक्त गाव या सोहळ्यात ना. देसाई बोलत होते.
जयहिंद फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद सैनिक परिवार कृतज्ञता सोहळ्यात मंत्री देसाईच्या अधिकाऱ्यांना सूचना या कार्यक्रम प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, तरुण भारतच्या आवृत्ती प्रमुख प्रगती जाधव, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेवक अविनाश कदम, सभापती संकेत साठे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे, जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, राष्ट्रीय सचिव हनुमंत पांढरे, बाबासाहेब कदम यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना वीरमाता बीरपिता म्हणतात. मात्र त्याच्या पत्नीला विधवा पत्नी असा शासन दरबारी उल्लेख केला जातो. विधवा अथवा ऐवजी बीर पत्नी असा बदल येत्या अधिवेशनात सामान्य प्रशासन विभाग व माजी सैनिक कल्याण विभाग त्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निश्चित बदल करेन, असे आश्वासन नामदार शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. 
शहीद सैनिक परिवाराचा झाला सन्मान 
शहीद जवान अमोल अरुण माने, शहीद जवान मदन दत्ताजी जाधव, शहीद जवान प्रवीण अंकुश वायदंडे, शहीद जवान विनोद अंगद भोसले, शहीद जवान शेखर भीमराव जगदाळे, शहीद जवान योगेश गणपती गुरव, शहीद जवान लक्ष्मण संजय पवार, शहीद जवान अथर्व संभाजी कुंभार, शहीद जवान प्रशांत दिलीप कदम, शहीद जवान सागर परशुराम शिंदे, शहीद जवान बाळासाहेब अंकुश पांढरे, शहीद जवान सचिन बाबुराव कापूरकर, शहीद जवान विधिप दिलीप जाधव, शहीद जवान सोमनाथ शामराव सुर्वे, शहीद जवान प्रमोद जग्गनाथ कदम 
आमदार शेखर निकम, प्रगती पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी जयहिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, नगरसेवक अविनाश कदम यांनीही मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत मांढरे यांनी तर सूत्रसंचालन सचिन ताबरे व केशव कोदे यांनी केले व आभार जिल्हाध्यक्ष ॲड. जयदीप भोसले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी जयहिंदच्या सातारा, जावली, बाई, खटाव, बारामती, कराड, अमरावती व मुंबई शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Tags :

.