ते विरोध करत आहेत म्हणून मी आता फाशी घेऊ का? बृजभूषणसिंह यांचं वक्तव्य
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे जवळचे नातेवाईक संजय सिंग यांची नियुक्ती झाली आहे. या निकालावर अनेक कुस्तीगीरांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीगीर साक्षी मलिक हिने पुन्हा कधीही कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतला. तर कुस्तीगीर बजरंग पुनिया याने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. यावरुन बृजभूषण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आंदोलन करणारे सर्व कुस्तीगीर हे काँग्रेसच्या बाजूचे आहेत. त्यांची लोकं आहेत. त्यांना कोणीही पाठिंबा देणार नाही. इतर कोणतेही कुस्तीगीर त्यांना पाठिंबा देत नाहीयेत. कारण ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ते विरोध करत आहेत म्हणून मी आता फाशी घेऊ का? अशी कडवट प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली.
काही कुस्तीगीर अजूनही विरोध करत असतील आणि साक्षी मलिकने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर मी काय करु शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना याचा अधिकार कोण देतं. ते आज निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसत आहेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.