For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : शाळी नदी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत ; शेजारील गावांना दूषित पाण्याचा धोका .

12:29 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   शाळी नदी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत   शेजारील गावांना दूषित पाण्याचा धोका
Advertisement

                                मलकापूरमधील शाळी नदी कचऱ्याच्या विळख्यात

Advertisement

शाहूवाडी : मलकापूर शहरात असलेल्या शाळी नदीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे . नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व अन्य दुर्गंधी युक्त वस्तू  येत आहेत यामुळे नदी परिसरातील गावांना दूषित पाण्याचा धोका निर्माण झाला आहे . यामुळे कोपार्डे ,पेरीड , सांबू आदी परिसरातील नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे . नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे .

      शाळी नदीत अलीकडच्या काळात घाणीचे साम्राज्य चांगलेच वाढले आहे .पाण्यावर अनेक वस्तू तरंगताना दिसत आहेत याशिवाय दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्यात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .यामुळे शाळी नदीची स्वच्छता कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे . या पूर्वी अनेक वेळा याबाबत निवेदन देण्यात आले आहेत .त्याचबरोबर नदी परीसरात स्वच्छता मोहीम देखील राबवली होती . मात्र पुन्हा एकदा शाळी नदी कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याचे दिसू लागल आहे .

Advertisement

     मागील काही दिवसापासून शेजारील गावात साथीच्या रोगाचा प्रसार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे .यामुळे परिसरातील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे . यामुळे या नदीची स्वच्छता तात्काळ करून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या तून होऊ लागली आहे

Advertisement
Tags :

.