महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डळमळीत गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आज आमनेसामने

06:44 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुल्लानपूर (पंजाब)

Advertisement

सलग पराभवांमुळे मोहीम डळमळीत झालेले पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आज रविवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात भिडणार असून घसरण रोखून विजयाच्या मार्गावर परतण्यास ते उत्सुक असतील. दिल्ली कॅपिटल्सकडून घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी विजेते गुजरात टायटन्स आठव्या स्थानावर घसरले आहेत. तो त्यांचा चार सामन्यांतील तिसरा पराभव होता.

Advertisement

दुसरीकडे, गुऊवारी रात्री मुंबई इंडियन्सकडून नऊ धावांनी पराभूत झालेला पंजाबचा संघही नवव्या स्थानावर संघर्ष करत आहे, सात सामन्यांत त्यांना पाच पराभव स्वीकारावे लागलेले असून दोन विजय नोंदविलेले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावशाली कर्णधार शिखर धवनच्या अनुपस्थितीमुळे त्यांना मोठा फटका बसला आहे आणि आजच्या सामन्यासाठी तो उपलब्ध होण्याबाबत शंका आहेत. धवनच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन कर्णधारपदाची धुरा वाहत आहे.

गेल्या वर्षी आठव्या स्थानावर राहिलेल्या पंजाबची व्यथा यंदाही तीच असून त्यांच्यासाठी सर्वांत मोठा चिंतेचा विषय त्यांच्या तज्ञ फलंदाजांचे अपयश हा आहे. प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रिली रोसोव्ह हे अपेक्षांना जागण्यात अपयशी ठरले आहेत. पंजाब किंग्जसाठी या मोसमातील एकमेव झळाळती बाजू म्हणजे शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या भारतीय खेळाडूंचे भक्कम प्रदर्शन आहे.

आतापर्यंत तीन विजयांची नोंद आणि चार पराभवांचा सामना केलेल्या गुजरातने त्वरित सुधारणा करणे आवश्यक आहे. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा आणि रशिद खान यासारखे दर्जेदार खेळाडूंचा समावेश असलेला सदर संघ उसळी घेण्याची ताकद बाळगतो. गोलंदाजीचा विचार करता मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे त्यांना खूप फटका बसलेला आहे.

संघ : गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुदर्शन, शाहऊख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशिद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बी. आर., मानव सुतार.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव्ह.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article