For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shaktipeeth Mahamarg: 'शक्तपीठा'च्या भोवती राजकारण्यांची 'शक्ती', आजी-माजी MP-MLA आंदोलनात

11:05 AM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
shaktipeeth mahamarg   शक्तपीठा च्या भोवती राजकारण्यांची  शक्ती   आजी माजी mp mla आंदोलनात
Advertisement

महामार्ग जाहीर झालेल्या नकाशात या तालुक्यातून रस्ताच दिसत नाही

Advertisement

By : जगदीश पाटील

गडहिंग्लज : नागपूरपासून सुरु होणारा आणि बांद्याला पोहोचणारा शक्तीपीठ महामार्ग गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातून जाणार का? हा सध्यातरी अनुत्तरीत प्रश्न आहे. कारण महामार्ग जाहीर झालेल्या नकाशात या तालुक्यातून रस्ताच दिसत नाही.

Advertisement

असे असतानाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून न्यावा, अशी मागणी करताच सर्वच बाजूंनी राजकारणाला उकळी फुटली. मोर्चे, प्रतिमोर्चे पहावयास मिळाले. आजी-माजी आमदार, खासदार या आंदोलनात उतरले. हे सारे पहाता शक्तीपीठाच्या भोवती गडहिंग्लज विभागातील राजकारण्यांची शक्ती पणाला लागल्याचे पाहवयास मिळते.

शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाल्यानंतर हा महामार्ग कोल्हापूरहून पुढे कोकणात सरकतो आहे. या पध्दतीचाच नकाशा जाहीर झाला. तशी चर्चा सुरु झाली. या महामार्गाला कोल्हापूर, सांगलीतून शेतकऱ्यांनी विरोध सुरु केला. राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून याची चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव विचारात घेत विधानसभेला सावध पवित्रा घेत प्रत्येक डाव महायुतीकडून टाकला जात होता. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध होतोय, हे लक्षात येताच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही, असा शासन निर्णय निवडणुकीच्या दरम्यान प्रसिध्द केला.

त्यामुळे हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील शेतकरी सुखावला. परंतु, पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु होणार, याची चर्चा सुरु झाल्यानंतर राजकीय पातळीवर वेगाने हालचाली होत कोल्हापूरला शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाल्यानंतर हा महामार्ग कोल्हापूरहून पुढे कोकणात सरकतो आहे.

या पध्दतीचाच नकाशा जाहीर झाला. तशी चर्चा सुरु झाली. या महामार्गाला कोल्हापूर, सांगलीतून शेतकऱ्यांनी विरोध सुरु केला. राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून याची चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव विचारात घेत विधानसभेला सावध पवित्रा घेत प्रत्येक डाव महायुतीकडून टाकला जात होता.

शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध होतोय, हे लक्षात येताच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही, असा शासन निर्णय निवडणुकीच्या दरम्यान प्रसिध्द केला. त्यामुळे हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील शेतकरी सुखावला. परंतु, पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु होणार, याची चर्चा सुरु झाल्यानंतर राजकीय पातळीवर वेगाने हालचाली होत कोल्हापूरला महामार्ग रोखण्यात आला.

यात महायुतीच्या विरोधातील नेते मंडळींची हजेरी होतीकोल्हापूर भागात विरोध असल्याची चर्चा सुरु असतानाच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून न्यावा, अशी मागणी केली. त्यासाठी 4 मार्गही सुचवले, ही बातमी प्रसिध्द होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

पाटील, कॉ. संपत देसाई, उबाठाचे जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे, शरद पवार राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, जनता दलाच्या स्वाती कोरी, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस विद्याधर गुरबे, स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर या विरोधकांनी या विभागातून शक्तीपीठ महामार्ग नेण्यास कडाडून विरोध सुरु केला.

यासाठी गडहिंग्लजला रास्ता रोको करण्यात आले. यामध्ये भाजपाचे युवा नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी या आंदोलनात थेट सहभाग दाखवल्याने खळबळ उडाली. रास्ता रोकोला प्रतिसाद मिळाला. यावर 34 जणांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले.

शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. याचवेळी आमदार शिवाजीराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य करत निशाना साधला. महामार्गाचे अर्थगणित मांडतही सरकारवर टीका करण्यात आली, याची चर्चा सुरु झाली.

किसनराव कुराडे यांची उपस्थिती चर्चेचा विषय

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चाची हवा विरण्यापूर्वीच आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांना एकत्रित करत गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयावर मोठ्या उपस्थितीत शक्तीपीठाच्या समर्थनात मोर्चा काढला. यावेळी आमदार पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरकस टीका केली.

चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा महामार्ग चंदगड मतदारसंघातून नेल्याशिवाय आपण थांबणार नाही, असे निक्षून सांगितले. या मोर्चात त्यांच्या सोबत माजी मंत्री भरमू पाटील सहभागी होते. यापेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे यांची उपस्थिती विशेष चर्चेची ठरली. शक्तीपीठाच्या समर्थनात गडहिंग्लजला निघालेल्या मोर्चाची राज्यभर चर्चा झाली.

राजकीय वातावरण निघाले ढवळून

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आणि विरोधात असे दोन्ही बाजूंनी गडहिंग्लजला मोर्चे निघाले आहेत. मोर्चात दोन्ही बाजूंनी विविध पक्षाचे प्रमुख नेते मंडळी सहभागी झाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निघालेले मोर्चे चांगलेच चर्चेचे झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर या निमित्ताने पुन्हा एकदा गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

कर्नाटकच्या हद्दीतून जावे लागणार

नागपूरपासून सुरु होणारा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला गोवा हद्दीलगत असणाऱ्या बांद्यापर्यंत पोहचणार आहे. या महामार्गाचा सध्यस्थितीत प्रसिध्द झालेला नकाशा यापासून गडहिंग्लज, चंदगड तालुके फारच लांब दिसतात असे असताना हा महामार्ग चंदगड मतदारसंघातून जावा, अशी मागणी लावून धरली आहे.

पण चंदगडमधून हा महामार्ग नेताना कर्नाटक राज्याच्या हद्दीतून यावे लागणार आहे. याला कसे नियमात बसवणार? हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत असून महाराष्ट्रातूनच हा महामार्ग नेण्यात येणार असल्यास पर्याय कोणता? याची चर्चा गावपातळीवर रंगते आहे.

Advertisement
Tags :

.