For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोळंबेतील शक्तिपीठ महामार्ग भूसंपादन सुनावणी ऐनवेळी रद्द; ग्रामस्थांचा संताप

04:57 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
झोळंबेतील शक्तिपीठ महामार्ग भूसंपादन सुनावणी ऐनवेळी रद्द  ग्रामस्थांचा संताप
Advertisement

ओटवणे : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात झोळंबे प्राथमिक शाळेत मंगळवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आलेली सुनावणी अचानक रद्द करण्यात आली. सुनावणीच्या निर्धारित वेळेच्या अवघ्या दीड तास आधी याबाबतची माहिती देण्यात आल्याने झोळंबे ग्रामस्थ आणि शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement

महसूल विभागाच्या माहितीनुसार, प्रांताधिकारी वीरसिंग वसावे यांना शासकीय कामानिमित्त मुंबईला जावे लागणार असल्याने सुनावणी रद्द करण्यात आली. यापूर्वीही झोळंबे गावात दोन वेळा भूसंपादन सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, हरकती नोंदवण्यासाठी आवश्यक कालावधी न देता नोटिसा बजावण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी त्या नोटिसा स्वीकारल्या नव्हत्या.

मंगळवारी तिसऱ्यांदा सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, दुपारी 2.37 वाजता, म्हणजे सुनावणीच्या अवघ्या दीड तास आधी, ती रद्द करण्यात आल्याचे संघर्ष समितीला कळविण्यात आले.

Advertisement

या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे दीपक रामकृष्ण गवस, अमोल हरी गवस, सुरेश रामा गवस, गणेशप्रसाद शंकर गवस, पुरुषोत्तम तेंडुलकर, लक्ष्मण दत्ताराम गवस, शंकरराव हरी गवस, सुधीर शिवाजी गवस, सुधीर सदानंद गवस, पांडुरंग विनायक गवस आणि सिताराम दिनकर भिडे यांच्यासह ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.