For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तिकांत दास सलग दुसऱ्यांदा अव्वल बँकर

06:45 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
शक्तिकांत दास सलग दुसऱ्यांदा अव्वल बँकर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सलग दुसऱ्या वषी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवड झाली आहे. शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये ‘ए प्लस’ रेटिंग मिळाले आहे. महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे. यापूर्वी गेल्यावषीही त्यांना सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवडण्यात आले होते. गेल्यावषी जूनमध्ये दास यांना लंडनमध्ये आयोजित सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवषी प्रकाशित केले जाते. यामध्ये 101 देश, प्रदेश आणि जिल्ह्यांच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरना श्रेणीबद्ध केले आहे. यामध्ये बँक ऑफ युरोपियन युनियन, इस्टर्न पॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचा समावेश आहे.

Advertisement

शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25 वे गव्हर्नर आहेत. जी20 परिषदेत त्यांना भारताचे शेर्पा म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. ते 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयने जवळपास दीड वर्षे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. याशिवाय महागाईवरही नियंत्रण आले आहे. या कालावधीत देशाने 8 टक्क्यांपेक्षा जास्त आर्थिक विकासदर गाठला आहे.

Advertisement
Tags :

.