For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैलेंद्र लवकर घर बांध, मी तुझ्या घरी येणार

05:39 PM Feb 23, 2025 IST | Radhika Patil
शैलेंद्र लवकर घर बांध  मी तुझ्या घरी येणार
Advertisement

सातारा : 

Advertisement

शैलेंद्र घर लवकर बांध. मी तुझ्या घरी भेट देणार आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे प्रमाणपत्र प्रदान करताना लाभार्थी शिवथर गावचे शैलेंद्र बोर्डे यांच्याशी बोलले. त्यांनी संवाद साधल्याने लाभार्थी आनंदाने मंजुरीचे प्रमाणपत्र घेवून घर बांधायचेच या निर्धाराने बाहेर पडले. दरम्यान, या सोहळ्याला जिह्याच्या कानाकोपऱ्यातून लाभार्थी, त्या गावचे ग्रामसेवक उपस्थित होते. घरकुल योजनेबाबत मंत्री शिवेंद्रराजे यांनी उपस्थित कार्यक्रमात माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांचेही मार्गदर्शन ऑनलाईन असे लाभार्थ्यांनी ऐकले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात घरकुल लाभार्थ्यांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिह्यातील 45 हजार 422 घरांना मंजूरी दिल्याची माहिती प्रास्तविकात दिली. त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रराजे यांनीही या योजनेत ज्यांना घरे मिळाली आहेत. त्यांनी घरे बांधून पूर्ण करावी, आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

  • या लाभार्थ्यांचा झाला सन्मान

घरकुल मंजूरी पत्राचे वितरणामध्ये पाटण तालुक्यातील वेखंडवाडीच्या सविता काळकुंटे, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीच्या सविता काटकर, महागावच्या सुशिला रसाळ, शिवथरचे शैलेंद्र बोर्डे, कराड तालुक्यातील पालीच्या वनिता चव्हाण, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचे संतोष निकम, जावली तालुक्यातील रिटकवलीच्या नंदा चव्हाण, वाई तालुक्यातील अनवडीच्या सविता चव्हाण, खंडाळा तालुक्यातील भादेच्या छाया नलावडे, तसेच सर्वात जास्त मंजूरी दिलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सन्मानामध्ये जावली तालुक्यातील आलेवाडीचे चंद्रकांत कोळी, कराड तालुक्यातील चोरेचे गफूर अत्तार, खंडाळा तालुक्यातील भादेचे सुनील धायगुडे, खटाव तालुक्यातील गुरसाळेचे हनुमंत फडतरे, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचे सुर्यकांत कांबळे, महाबळेश्वर तालुक्यातील भेकवलीचे निनाद पवार, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुकचे अमोल पवार, पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरीचे चंद्रवंदन साळुंखे, फलटण तालुक्यातील विडणीचे अंकुश टेंबरे, सातारा तालुक्यातील कामथी तर्फ साताऱ्याच्या रोहिणी पवार, वाईच्या कोंढावळेचे जयंत भेसे, तसेच तांत्रिक सहाय्यकामध्ये कराडचे नितीन यादव, पाटणचे गणेश कोळी, माणचे प्रीतम पवार, डेटा ऑपरेटरमध्ये कराडचे संदेश कदम, कोरेगावचे अक्षय चांदेकर, वाईचे प्रीतम आंबळे यांचा गौरव करण्यात आला.

  • ग्रामविकास अधिकाऱ्यांची शोधाशोध

काही गावाच्या लाभार्थ्यांना तुमचा गौरव होणार आहे पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हणून साताऱ्याला ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बतावणी करुन बोलवून घेतले होते. परंतु सभागृहात आल्यानंतर तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत त्या गावचे लाभार्थी त्या गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना शोधत होते. अखेर वैतागून खाजगी वाहन करुन आलेले लाभार्थी परत फिरले. तसेच सासू बाहेर लहान बाळाला मांडीवर घेवून सभागृहाच्या बाहेर बसली होती तर प्रमाणपत्र आतमध्ये घ्यायला सुन सभागृहात गेली होती. ती केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भाषण होईपर्यंत बाहेर आलेली नव्हती. प्रमाणपत्र वाटप झाले की लगेच लाभार्थी व त्यांचे नातेवाईक बाहेर जातात म्हणून सभागृहांची सर्व दारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना बाहेर पडता आले नव्हते.

Advertisement
Tags :

.