For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहजाद भट्टी नेटवर्क दहशतवादी संघटना म्हणून घोषित; केंद्राचा यूएपीएअंतर्गत मोठा निर्णय

05:19 PM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहजाद भट्टी नेटवर्क दहशतवादी संघटना म्हणून घोषित  केंद्राचा यूएपीएअंतर्गत मोठा निर्णय
Advertisement

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्क (SBN) ला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात अधिसूचना जारी करत संघटनेचा समावेश यूएपीएच्या पहिल्या अनुसूचीत करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी नेटवर्ककडून सीमा ओलांडून शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांची तस्करी, तसेच तरुण आणि स्थानिक गुन्हेगारांना दहशतवादी कारवायांकडे वळवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. संघटनेकडून डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रक्षोभक संदेश प्रसारित केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

विविध गंभीर कायद्यांअंतर्गत प्रकरणांचा उल्लेख

केंद्राच्या अधिसूचनेत नेटवर्कशी संबंधित कथित सदस्यांविरोधात यूएपीए, भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कायद्यांअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांचा संदर्भ देण्यात आला आहे. सरकारच्या मते, या नेटवर्कच्या कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो.

Advertisement

गृह मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर यूएपीएच्या कलम ३५ अंतर्गत अधिसूचित दहशतवादी संघटनांची स्वतंत्र यादी उपलब्ध आहे.

डिजिटल माध्यमातून प्रक्षोभक संदेशांचा आरोप

सरकारच्या म्हणण्यानुसार, शहजाद भट्टी नेटवर्क विविध डिजिटल संप्रेषण माध्यमांचा वापर करून प्रक्षोभक मजकूर प्रसारित करत होते. हिंसक कारवायांना प्रोत्साहन देऊन देशाची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा यांना आव्हान निर्माण करण्याचा आरोपही अधिसूचनेत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शहजाद भट्टी नेटवर्कवर यूएपीएअंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयानंतर संबंधित यंत्रणांकडून पुढील कायदेशीर आणि सुरक्षा कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.