शाहू महाराजांना उमेदवारी हे शरद पवारांचे षडयंत्र; संजय मंडलिकांचा आरोप
कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल असा विश्वास व्यक्त करत आमदार सतेज पाटील हे माझे चांगले मित्र असून माझ्याबरोबर ते पुन्हा स्टेजवर येतील असे वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच शाहू महाराजांना निवडणुकीत उभे करण्याचे षडयंत्र शरद पवार यांनी आखले असून त्यांना जुना राग काढायचा असेल असे म्हणून त्यांनी शरद पवारांवरही टिका केली.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार कि नाही याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. उमदेवारी आपल्या नेत्यालाच मिळणार असा विश्वास असणाऱ्या कार्य़कर्त्यांनी काल मेळावा घेऊन संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.
लोकसभेसाठी उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्थेबद्दल विचारले असता ते म्हणाले, "माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. या संदर्भात मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला होता. उमेदवारी जाहीर होईल असे त्यांनी मला सांगितले असून उमेदवारी घोषित झाल्यावर मी महायुतीच्या सगळ्या पक्षांचा मेळावा घेणार आहे. संदर्भात मी मुंबईत चंद्रकांतदादा पाटील , हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्याच बरोबर समरजित घाटगे आणि महाडिक यांचेही बोलणे सकारात्मक आहे." असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले, आमदार सतेज पाटील माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते पुन्हा माझ्याबरोबर स्टेजवर येतील. माझ्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह सर्व्हे कधीच आला नव्हता. मागील वेळी लोकांनी मला भरभरून मतदान दिले होते. माझ्याबरोबर जनमत नाही असा प्रचार हे काही कुजक्या मेंदूचे काम आहे." असे त्यांनी म्हटलं आहे.
शाहू महाराजांच्या उमेदवारीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "शाहू महाराजांना निवडणुकीत उभे करण्याचे पवारांचे षडयंत्र आहे. शरद पवारांना मंडलिकांसोबचा जुना राग काढायचा असेल. पण जनता सुद्धा आता याला तयार आहे." असे त्यांनी म्हटले आहे.