For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagari | छत्रपती शाहू महाराज यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी धरणस्थळावर अभिवादन

12:52 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
radhanagari   छत्रपती शाहू महाराज यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी धरणस्थळावर अभिवादन
Advertisement

                   राधानगरीत शाहू महाराजांना १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Advertisement

राधानगरी ( महेश तिरवडे ) - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी धरण परिसरात शाहू स्मृती केंद्र स्मारक समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी धरण स्थळावरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय व बहुजन कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच समाजात समता व बंधुभाव वाढवण्यासाठी त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच या ठिकाणी असलेल्या दाजीराव विचारे, पिराजीराव घाटगे, महाराणी राधाबाई, सर विश्वेश्वरय्या , छ,राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, प स सदस्य मोहन पाटील, चंद्रकांत चौगले, चंद्रशेखर कांबळे सुरेश बचाटे, बशीर राऊत, दादासो सांगावकर, भरत कासार, सचिन भाटळे, महादेव पाटील, महादेव म्हापसेकर, दयानंद सावर्डेकर, सम्राट केरकर, रुपेश बोंबाडे, प्रविण कोरगावकर,यासह शाहू प्रेमी संघटनेचे सदस्य उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा, विश्वास पाटील यांनी केले तर आभार सम्राट केरकर यांनी मानले

Advertisement

Advertisement
Tags :

.