For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रचंड शक्तीप्रदर्शनात शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल

06:53 PM Apr 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
प्रचंड शक्तीप्रदर्शनात शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Shahu Maharaj Chhatrapati
Advertisement

कोल्हापूर सह हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आज महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले मतदारसंघातून सत्यजीत पाटील सरूडकर यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणुक अधिकाऱ्यांकडे भरण्यात आले.

Advertisement

महाविकास आघाडीचे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी अनुक्रमे शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांची नावे अंतिम झाल्यानंतर आज दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली.

दसरा चौकातून अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीसाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गाड्यांनी दाखल झाले होते. यामध्ये विशेषता महिला वर्गाचा सहभाग लक्षणिय होता. धनगरी ढोल आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. दुपारी १२ च्या दरम्यान शाहू महाराज छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला.

Advertisement

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार मलाोजीराजे छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हि.बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे यांनी उपस्थिती लावली.

Advertisement
Tags :

.