For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहू छत्रपतींच्या विजयाचा कदमवाडी, जाधववाडीत निर्धार

03:13 PM Apr 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
शाहू छत्रपतींच्या विजयाचा कदमवाडी  जाधववाडीत निर्धार
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील जाधववाडी व कदमवाडी या भागात हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना मधुरिमाराजे आणि राजनंदा घाटगे यांनी उपस्थिती दर्शवल्याने नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले. दरम्यान, या कार्यक्रमांनंतर या दोन्ही भागात झालेल्या प्रचारफेरीतही राजघराण्यातील प्रतिष्ठितांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Advertisement

कोल्हापूरचे अधिपती शाहू छत्रपती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना साथ देण्यासाठी संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजराजे यांच्यासह राज परिवारातील सदस्यांनी स्वत?ला झोकून दिले आहे. कदमवाडीतील खंडेराव घाटगे सरकार यांच्या पत्नी राजनंदा घाटगे यांनी कदमवाडीत हनुमान जयंतीच्या निमित्ताने घाटगे परिवारातर्फे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते हनुमान मंदिरात पूजा-अर्चा झाली. त्यानंतर घाटगे फार्म्स परिसरात भाविकांसाठी आयोजित महाप्रसाद कार्यक्रम झाला. यावेळी राजनंदा घाटगे, खंडेराव घाटगे सरकार, श्रीकांत घाटगे सरकार, विक्रमसिंह घाटगे सरकार, संग्रामसिंह घाटगे सरकार, उदयसिंह घाटगे सरकार यांच्यासह संयुक्ताराजे घाटगे सरकार, विशाखा घाटगे सरकार, मनिषाताई जाधव सरकार, विनिताताई घाटगे सरकार, नीताताई चव्हाण सरकार, शिवांजलीताई चव्हाण सरकार उपस्थित होते. माजी महापौर भीमराव पोवार, वैशाली डकरे, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक तानाजी कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम धनवडे, डॉ. वैभव माळी, तात्यासाहेब पाटील, अरविंद मेढे, उदय फाळके, राजेंद्र अत्याळकर, युवक काँग्रेसचे रियाज सैय्यद, अमोल शेंडगे, दीपक शेळके, नीलेश भोसले, संपत चौगले, अजित गुरखे, दीपक दामुगडे, शिवाजी कांबळे, अनिल कारंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मधुरिमाराजे छत्रपती आणि राजेश लाटकर यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला भीक न घालता शाहू महाराजांच्या विजयाचे लक्ष्य ठेवून कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

भर उन्हात मधुरिमाराजे महाप्रसाद उपक्रमात दंग
रखरखत्या उन्हाची तमा न बळगता उन्हाची तमा न बाळगता मधुरिमाराजे छत्रपती जाधववाडी येथील हनुमान मंदिराच्या महाप्रसाद वाटप सहभागी झाल्या. माजी नगरसेविका संगीता काटकर, डॉ. सुनील काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे संयोजन उदय फाळके, गणपतराव जाधव, नंदकुमार जाधव, अजित जाधव, संपत जाधव, राजेंद्र जाधव, अमित जाधव, अमर काटकर, सुषमा जाधव, शैलजा जाधव, शोभा जाधव, वंदना जाधव यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.