साधना शिबिर व श्री माधवनाथ महाराज पुण्यस्मरण दिनाचे औचित्याने शाहू छत्रपतींनी दिली भेट
श्री सद्गुरु दादा तथा माधवनाथ महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त तीन दिवसाच्या ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात प.पू.आनंदनाथ महाराज यांच्या हस्ते कलश स्थापना व श्री सद्गुरुंच्या पादुका पूजन करून करण्यात आली. ध्यान शिबिरास 300 च्या वर अनुग्रहित साधकांनी उपस्थिती लावली होती.
या शिबिरादरम्यान आंध्र प्रदेश येथील तिरुमला (तिरुपती) देवस्थान चे डॉ. टी. के.सुरेश हे विश्वपंढरी समूहाचे अतिथी म्हणून 2 दिवस विश्वपंढरी येथे उपस्थित होते. विश्वपंढरी समूहातर्फे डॉ.टी. के.सुरेश यांचा सत्कार ट्रस्ट चे अध्यक्ष श्री आनंदनाथ सांगवडेकर यांनी केला.
साधना शिबिर व श्री माधवनाथ महाराज पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून प.पू. दादा तथा माधवनाथ महाराज यांच्या नित्य वापरातील विविध वस्तू, साधने याची दर्शन सर्वांना सहज उपलब्ध व्हावे या संकल्पनेतून विश्वपंढरी देवांगणातील दादांच्या स्मृती स्थळी या सर्व वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. या स्मृती संग्रहस्थळाचे उदघाटन मा. आ. श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री माधवनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने कोल्हापूर संस्थानचे राजे श्री शाहू छत्रपती यांनी आज विश्वपंढरी येथे भेट दिली व दादांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी विश्वपंढरी समूहातर्फे ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदनाथ सांगवडेकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी श्री विश्ववती चे अध्यक्ष श्री निरंजनदास सांगवडेकर, सौ. विश्वा सांगवडेकर, सौ. नारायणी सांगवडेकर, संगीता सांगवडेकर, सांगवडेकर कुटुंबीय व भाविक उपस्थित होते.