For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविकासतर्फे शाहू छत्रपती लोकसभेच्या मैदानात; कोल्हापूरची अस्मिता बिनविरोध करुया : सतेज पाटील यांचे आवाहन

12:43 PM Mar 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाविकासतर्फे शाहू छत्रपती लोकसभेच्या मैदानात  कोल्हापूरची अस्मिता बिनविरोध करुया   सतेज पाटील यांचे आवाहन
MLA Satej Patil
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात श्रीमंती शाहू छत्रपती महाविकास आघाडीकडून उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. जर श्रीमंत शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील तर लोकसभेची ही निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले.

Advertisement

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा पेच आता संपल्यात असल्याचे मानले जाते. कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्यास शिवसेना तयार आहे. याबदल्यात सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेना लढवणार असल्याचे बोलले जाते. शाहू महाराज यांच्या निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होताच कोल्हापुरात जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत शाहू महाराज यांना निवडून आणणे हेच प्रथम कर्तव्य असल्याचे जाहीर केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत महायुतीतील नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी एक विधान केले होते. श्रीमंत शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहू नये, असे आवाहन ना मुश्रीफ यांनी केले होते. हाच धागा पकडत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे एकमत आहे. केवळ भाजपला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आमचं धोरण पक्कं ठरलं आहे. सक्षम उमेदवार देणे आणि भाजपच्या विरोधात निवडून आणणे, हे आमचे धोरण आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या लोकसभा निवडणुकीच्या माघारीवरून सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले आहे. ‘घर म्हणून संभाजीराजे यांची जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत संभाजीराजे यांना वारंवार विनंती केली होती. शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवावी, हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत,‘ हा आमचा प्रयत्न असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement

मनुवादाचा पराभावासाठी रिंगणात : सोशल मिडीयावर प्रचार
फॅसिस्ट प्रवृत्ती आणि मनुवादाचा पराभव करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशी टॅग लाईन असलेले फोटो आणि व्हिडीओ कोल्हापुरात सोशल मिडीयातून व्हायरल होत आहेत. आ. सतेज पाटील हे शाहू महाराज यांना फेटा बांधत असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात चर्चेचा विषय आहे.

Advertisement
Tags :

.