For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : शिवस्पंदन महोत्सवात शाहिरी बाण्याने विद्यापीठ परिसर दुमदुमला

01:18 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   शिवस्पंदन महोत्सवात शाहिरी बाण्याने विद्यापीठ परिसर दुमदुमला
Advertisement

                          विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने शिवस्पंदन महोत्सव गाजला

Advertisement

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवांतर्गत बुधवारी सादर केलेल्या शाहिरी बाण्याने शिवाजी विद्यापीठाचा परिसर दुमदुमला.मूकनाट्य, नकला, लघुनाटिका, पारंपरिक वाद्य वादनासह पोवाडा, भारूड, शिवगीते यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर पृथ्वीराज माळी आणि परिवार यांनी शाहिरी बाणा सादर केला. दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमााची रंगत वाढवली. कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरूडॉ. ज्योती जाधव, डॉ. रघुनाथ धमकेल, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. विनोद ठाकुर देसाई, डॉ. प्रल्हाद माने, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, सुरेखा अडके यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

आज शेवटचा दिवस
शिवस्पंदन महोत्सवाची आज सांगता होणार आहे. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात एकल नृत्य, समुह नृत्य आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

Advertisement
Tags :

.