For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कॉकटेल 2’मध्ये शाहिदचा नवा अवतार

06:51 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘कॉकटेल 2’मध्ये शाहिदचा नवा अवतार
Advertisement

चालू वर्षात प्रदर्शित होणार चित्रपट

Advertisement

होमी अदजानियाकडून दिग्दर्शित चित्रपट ‘कॉकटेल 2’ यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शाहिद कपूर, क्रीति सेनॉन आणि रश्मिका मंदाना हे यात  मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट सप्टेंबरच्या आसपास प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे.

कॉकटेल 2 पूर्वी शाहिदचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा ओ रोमियो नंतरचा चित्रपट 6 महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे दोन्ही चित्रपटांना स्वत:चे स्थान मिळणार असून प्रेक्षकांना शाहिदला एका नव्या अवतारात पाहण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

ओ रोमियो अणि कॉकटेल 2 हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. कॉकटेल 2 चे चित्रिकरण पूर्ण झाले असून आता त्याची प्रदर्शनपूर्व तयारी सुरू आहे. कॉकटेलला एक स्प्रीच्युअल सीक्वेल ठरविले जात असून याची निर्मिती दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सकडून करण्यात आली आहे. लव रंजनने याची पटकथा लिहिली आहे.

Advertisement
Tags :

.