For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहिद अन् रश्मिका पुन्हा एकत्र

06:18 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
शाहिद अन् रश्मिका पुन्हा एकत्र
Advertisement

अभिनेता शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना अत्यंत लवकरच

Advertisement

‘कॉकटेल 2’ चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, परंतु यापूर्वी या जोडीला एक नवा चित्रपट मिळाला आहे. दिग्दर्शक अमित शर्माने शाहिद आणि रश्मिकाला स्वत:च्या आगामी रोमँटिक कॉमेडीसाठी निवडले आहे. दोन्ही कलाकारांनी अलिकडेच ‘कॉकटेल 2’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे.

अमित शर्मा यांनी ‘मैदान’ आणि ‘बधाई हो’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. नव्या चित्रपटाची निर्मिती सुनील खेतरपाल, वर्मिलियन वर्ल्ड बॅनर अंतर्गत जियो स्टुडिओजच्या सहकार्याने केली जाणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरविण्यात आलेले नाही. याचे चित्रिकरण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे समजते.

Advertisement

शाहिदचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ति डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिशा पाटनी, फरीदा जलाल आणि विक्रांत मैसी हे कलाकार दिसून आले ओत. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यानंतर शाहिद हा ‘फर्जी’ या वेबसीरिजचे चित्रिकरण सुरू करणार आहे. तर रश्मिका ही विजय देवरकोंडासोबत ‘रणबाली’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.