For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शाहिन अफ्रीदी कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

06:22 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
शाहिन अफ्रीदी कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज तसेच पाकच्या टी-20 संघाचा कर्णधार शाहिन शहा आफ्रीदीने आपले कर्णधारपद सोडण्याचे ठरविले आहे. अलिकडेच पाक संघाच्या भविष्यकाळात टी-20 प्रकारासाठी नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्याबाबत पीसीबीने बैठक आयोजित केली होती पण या बैठकीला शाहिन अफ्रीदीला बोलावण्यात आले नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. नजिकच्या काळात शाहिन अफ्रीदी आपल्या कर्णधारपदाचा त्याग करणार असल्याचे वृत्त पाकच्या क्रिकेट वर्तुळात पसरले आहे.

पीसीबीने काही दिवसांपूर्वीच संघाच्या नियोजित आराखडाबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कर्णधार तसेच प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली. पण पीसीबीचे चेअरमन मोहसिन नक्वी यांनी किंवा राष्ट्रीय निवड समिती सदस्यांनी आपल्याला याबाबत कोणतीच कल्पना दिली नाही. त्यामुळे शाहिन अफ्रीदी पीसीबीच्या या निर्णयाबाबत नाराज झाला असून तो लवकरच आपल्या टी-20 संघाच्या कप्तानपदाचा राजिनामा देणार असल्याचे समजते. पीसीबीच्या प्रमुखांनी राष्ट्रीय निवड समिती सदस्य तसेच बाबर आझम समवेत आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबाबत आगामी आठवड्यात चर्चा करण्याचे ठरविले आहे. पीसीबीला मी टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नको असेन तर मला त्यांनी स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे, असेही अफ्रीदीने म्हटले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर पीसीबीने शाहिन अफ्रीदीची पाकच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती. अफ्रीदीच्या नेतृत्वाखाली पाक संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत हार पत्करावी लागली होती.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
×

.