कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : शहापूर तलाठी, कोतवाल 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

01:52 PM Nov 07, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                         लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

Advertisement


इचलकरंजी
: वारसा नोंद प्रकरणात गट खुला करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना शहापूर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात गुरुबारी अडकले. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२, रा. मगदुम कॉलनी, जयसिंगपूर) हा तलाठी असून नेताजी केशव पाटील (वय ४५, रा. म्हसोबा रोड, दर्गा गल्ली, शहापूर) हा कोतवाल आहे. स्टेशन रोडवरील महापालिका परिसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिसांत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दाखल केली होती. नाव नोंदणीसाठी तक्रारदाराकडून सतत पाठपुरावा सुरू होता. गट क्रमांक ७२९ वरील ब्लॉक हटवून गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यावतीने २५ हजार रुपयांची मागणी केली. सुरुवातीला १० हजार आणि काम पूर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. या कामी लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने ३ नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर तक्रार नोंदवली.

सोशल मीडियावर पुन्हा चर्चा

नुकताच सांगली नाका येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाची आमदार राहुल आवाडे पाहणी करताना इचलकरंजीचे सहाय्यक तलाठीकडून गैरप्रकार आढळून आला. त्यानंतर आता शहापूर तलाठी आणि कोतवाल लाच प्रकरणात सापडल्याने याबाबतची चर्चा शहरात रंगली होती. तसेच प्रशासनातील भ्रष्टाचारावरही सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली होती.

तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी पथकाने तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती. गुरुवारी तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील यांना चहाच्या टपरीवर रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई उपाधीक्षक देवैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, कृष्णा पाटील आणि प्रकाश चौगुले यांनी केली.

कारवाईनंतर दोन्ही संशयितांच्या घरी झाडाझडती घेण्यात आली. संशयितांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील तलाठी व संघटनांचे पदाधिकारी ठाण्यात पोहोचल्याने परिसरात मोठी गर्दी झाली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharatSocialMediaAnti Corruption Bureau (ACB) KolhapurIchalkaranji newsMaharashtra Corruption Newsribery trap operationShahapur Talathi Bribe Case
Next Article