For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूर परिसर शिवमय, आकर्षक चित्ररथ मिरवणूक

06:52 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहापूर परिसर शिवमय  आकर्षक चित्ररथ मिरवणूक
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागातर्फे शनिवारी चित्ररथ मिरवणूक उत्साहात पार पडली. भगवे ध्वज, मराठमोळी वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि शिवभक्तांचा उत्साह व आकर्षक चित्ररथ देखाव्यांमुळे परिसर शिवमय बनला होता. शिवाय पावसातही ऐतिहासिक आणि वैभवशाली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात झाली.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मध्यवर्ती महामंडळ शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, महादेव पाटील, गोपाळ बिर्जे, प्रदीप शेट्टीबाचे, श्रीधर जाधव आदींच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. नार्वेकर गल्ली, शहापूर येथील बालचमूंच्या चित्ररथ गाड्याचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत कदम, राजाराम सूर्यवंशी, हिरालाल चव्हाण, दिलीप दळवी, ज्ञानेश मण्णूरकर, सूरज लाड आदी उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती मराठा युवक मंडळ होसूरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा पन्हाळगडावरील भेटीचा प्रसंग सादर करण्यात आला.

Advertisement

चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झालेल्या कलाकारांनी हुबेहुब शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मावळे, महाराणीची भूमिका उत्कृष्टरित्या सादर केली. भगवे झेंडे, भगवे पोशाख परिधान करून शिवभक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागातर्फे बॅ. नाथ पै चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुढे खडेबाजार शहापूर, शिवाजी उद्यान रोड, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, शनिमंदिर, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड, अंबाभुवन, सेंट मेरीज हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, संचयनी सर्कलमार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे मुख्य मिरवणुकीत ही चित्ररथ मिरवणूक सहभागी झाली.

पावसामुळे उद्घाटनाला उशीर

शनिवारी दुपारी सुरू झालेल्या वळीव पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीच्या प्रारंभाला उशीर झाला. पावसामुळे कार्यकर्ते शिवभक्त आणि कलाकार लवकर बाहेर पडू शकले नाहीत. मात्र पाऊस ओसरल्यानंतर चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती.

Advertisement
Tags :

.