भुदरगड तालुक्यातून शाहू छत्रपतींना सर्वाधिक मताधिक्य लाभणार : विश्वजित जाधव
शहाजीराजे यांच्या संपर्क दौऱ्यास गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद
गारगोटी : प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील जनता ही कष्टाळू, प्रामाणिक व सत्यमार्गाने चालणारी सर्वसामान्य अशी आहे. शाहू छत्रपती उमेदवारी ही देखील अशा सर्वसामान्य माणसासाठीच असल्याने भुदरगड तालुक्यातून शाहू छत्रपती यांना सर्वाधिक मतदान लाभणार, यात शंकाच नाही, असे प्रतिपादन तिरवडेचे माजी सरपंच व युवा नेते विश्वजीत दिनकरराव जाधव यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ शहाजीराजे छत्रपती यांनी कडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील निष्णप, नांदोली, पारदेवाडी, करडवाडी, पाचर्डे, दोनवडे, नितवडे, तिरवडे, देऊळवाडी, वेसरडे, म्हासरंग, अंतिवडे गावात झंझावाती संपर्क दौरा केला. त्यांच्या या संपर्क दौर्यास सर्वच गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तिरवडे येथील सभेत विश्वजीत जाधव म्हणाले की, कोल्हापूर जिह्याचा रखडलेला विकास पूर्णत्त्वास नेण्यासाठी शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची गरज आहे. शाहू छत्रपती कोल्हापूरच्या विकासात नवा इतिहास घडवतील, अशी आमची पक्की खात्री आहे.
शहाजीराजे छत्रपती म्हणाले, भुदरगड तालुक्यातून आमच्या प्रचार दौर्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. येथील जनतेने शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचा पक्का निर्धार केला आहे. हा निर्धार आम्हाला बळ देत असून येथील जनतेला आम्ही कदापीही विसरणार नाही.
‘प्रहार‘चे मच्छिंद्र मुगडे म्हणाले, जनतेच्या हृदयात शाहू छत्रपती यांना आदराचे स्थान असून छत्रपती घराण्याने कोल्हापूरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
यावेळी सचिन भांदीगरे, सतीश जाधव, सत्यजीत वरंडेकर, गारगोटीचे माजी सरपंच राजू काझी, सुधीर वर्णे, मोहन शिंदे, नितीन बोटे, अमर बरकाळे, प्रताप वारके आदींसह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित