जि.प.च्या हिमोग्लोबिन कीट खरेदीवर संशयाचे सावट
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आरोग्य विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात हेमोग्लोबिन तपासणी किटसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून खर्च केला. सदर किट्सची खरेदी ‘स्मार्ट क्यू आर टेक प्राईव्हेट लि.पुणे’ या कंपनीकडून करण्यात आली. पण या व्यवहाराची प्रक्रिया, गुणवत्तेची खात्री आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात माहिती अधिकारात प्राप्त दस्तावेजांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या असून, यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कारभारावर संशयाचे सावट गडद होत आहे. या खरेदी प्रक्रियेचा उहापोह करणारी वृत्त मालिका आजपासून...
जिल्हा परिषदेस 2 कोटींचा निधी मंजूर झाला होता. विशेष बाब म्हणजे सदर किट्सच्या खरेदीचा अंतिम खर्च 19,99,19,464 इतका दाखवण्यात आला आहे. म्हणजेच 99.58 टक्के निधीचा उपयोग झाला. सरासरी व्यवहारात निधी आणि खर्च यामध्ये काही प्रमाणात फरक राहतो. मात्र येथे दोन्ही आकडे जवळपास जुळवून आणल्याचे चित्र दिसते. जे नैसर्गिक वाटत नाही.
- गुणवत्तेचा अभाव
या खरेदी प्रक्रियेमध्ये ‘एनएबीएल’ प्रमाणनाचा गैरसमावेश हिमोग्लोबिन तपासणीसाठी वापरली जाणारी उपकरणे अत्यंत संवेदनशील स्वरुपाची असतात. त्यांची गुणवत्ता एनएबीएल (ऱूग्दहत् Aम्म्rाdग्tatग्दह ँद् दि ऊाstग्हु aह् ण्aत्ग्ंratग्दह थ्aंदूदगे) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चाचणी करून निश्चित करणे आवश्यक असते. मात्र, प्रस्तुत प्रकरणात अशा कोणत्याही ‘एनएबीएल’ चाचणी अहवालाचा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अत्यावश्यक चाचण्या टाळल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट होते.
- तांत्रिक त्रुटी आणि किट्सची कार्यक्षमता संशयास्पद
सदर खरेदी केलेल्या किट्सच्या तांत्रिक तपशीलांची पाहणी केल्यास त्यामध्ये आवश्यक असलेल्या निकषांशी विसंगती असल्याचे जाणवते. मिळालेल्या माहितीनुसार काही किट्समध्ये टेस्टिंगच्या अचूकतेचा अभाव आढळल्याचे अहवालात नमूद आहे. यामुळे आरोग्य सेवेमध्ये प्रत्यक्षात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- प्रशासनातील हलगर्जीपणा ?
ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली. मात्र त्यामध्ये आवश्यक ती दक्षता घेण्यात आली का ? याबाबत संदिग्धता आहे. सत्ताधारी राजकीय पदाधिकाऱ्यांचा तसेच वरिष्ठ प्रशासनाचा यामध्ये प्रभाव होता का ? याचाही तपास व्हावा अशी मागणी होत आहे.
- सामाजिक आणि आरोग्यात्मक परिणाम
आरोग्य विभागाच्या या निर्णयाचा थेट परिणाम कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागातील गरोदर महिला आणि बालकांवर होणार आहे. चुकीच्या किंवा अचूक नसलेल्या किट्समुळे तपासणीत चूक होण्याची शक्यता असल्याने रोगनिदान आणि उपचारात विलंब होऊ शकतो. त्यामुळे या घोटाळ्याचा सामाजिक आरोग्यावरही दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी प्रक्रियेची चौकशी करावी
या व्यवहाराची तातडीने उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषर्षीवर कठोर कारवाई करावी आणि चुकीच्या पद्धतीने खर्च केलेल्या निधीची वसुली केली जावी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करून चौकशी करावी.
- सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते
- हिमोग्लोबिन किट दुर्गम भागातील तपासणीसाठी सोईस्कर
आरोग्य विभागाकडून 2023-24 मध्ये हिमोग्लोबिन किट खरेदी केले असून त्याद्वारे रूग्णांची तपासणी सुरु आहे. दुर्गम भागातील आरोग्य तपासणी शिबिर आणि रूग्ण तपासणीदरम्यान या किटचा चांगला वापर होत आहे. आगामी काळात 60 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यावेळी या किटचा चांगला उपयोग होणार आहे.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे , जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर