महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शा’कॅरी रिचर्डसनमुळे महिलांच्या 4×100 मीटर रिलेत अमेरिका अव्वल

06:58 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरुष रिले संघावर मात्र अपात्र ठरण्याचा प्रसंग

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट-डेनिस, फ्रान्स

Advertisement

धावपटू शा’कॅरी रिचर्डसनने महिलांच्या 4×100 मीटर रिलेमध्ये अमेरिकेला अव्वल ठरविताना आपले पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर अमेरिकेचा पुरुष संघ 4×100 मीटर रिलेमध्ये कशी कामगिरी करतो ते पाहण्यासाठी तिने उपस्थिती लावली होती. पण पुरुष संघाच्या हाताला पदक लागणे तर दूरच, उलट त्यांच्याकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी घडली.

रिचर्डसनने गेल्या आठवड्याच्या शेवटी 100 मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदक जिंकले होते. रिलेमध्ये अमेरिकेला विजयापर्यंत नेताना शेवटच्या टप्प्यात तिने तिसऱ्या स्थानावरून प्रथम स्थानावर झेप घेतली. त्यानंतर पुरुष रिले संघाची शर्यत पाहण्यासाठी तिने समोरच्या रांगेत उपस्थिती लावली होती. पण या शर्यतीत अमेरिकेला पदकाने हुलकावणी देणे चालूच असून हा कालावधी आता विस्तारून 20 वर्षांवर पोहोचला आहे.

‘मला या महिलांसोबत खूप सोयीस्कर वाटले’, असे रिचर्डसनने नंतर बोलताना सांगितले. महिलाच्या रिले चमूमध्ये तिची प्रशिक्षण भागीदार व 100 मीटर शर्यतीतील कांस्यपदक विजेती मेलिसा जेफरसन, त्वनिशा टेरी तसेच 200 मीटर विजेती गॅबी थॉमस यांचा समावेश राहिला. दुसरीकडे, पुरुष रिले चमू नोहा लायल्सशिवाय उतरला. कोविडशी लढून 200 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर लायल्सने ऑलिम्पिकचा निरोप घेतला होता. पण तो असता, तरी त्यांना वाचवू शकला असता असे म्हणणे कठीण आहे.

कारण अमेरिकेसाठी ही शर्यत पहिल्याच टप्प्यात कोलमडली जेव्हा ख्रिश्चन कोलमन केनी बेडनारेकवर आदळला. त्यानंतर अस्ताव्यस्त पद्धतीने बॅटन देताना तो त्याच्या जवळून धावला. फ्रेड केर्लीने शेवटच्या टप्प्यासाठी बॅटन हातात घेतले तोपर्यंत अमेरिकी संघ सातव्या स्थानावर पोहोचला होता. बॅटन अयोग पद्धतीने हस्तांतरित केल्याबद्दल या संघाला नंतर अपात्र ठरविण्यात आले. या परिस्थितीवर लायल्स असता, तरी मात करू शकला नसता.

यामुळे आंद्रे दि ग्रासला संधी मिळून त्याने अन्यथा निराशाजनक ठरलेल्या आपल्या ऑलिम्पिक मोहिमेतून बाहेर सरून चमकदार ठसा उमटविला. त्याच्या जोरावर 37.50 सेकंदांच्या वेळेनिशी कॅनडाने सुवर्णपदक प्राप्त केले. डी ग्राससाठी पॅरिसमधील हे पहिले पदक आणि कॅनडासाठी 1996 नंतरचे या शर्यतीतील पहिले पदक होते. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि ब्रिटन तिसऱ्या स्थानावर राहिला. दरम्यान, अमेरिकेच्या राय बेंजामिनने अखेरीस जागतिक विक्रमधारक कर्स्टन वॉरहॉमच्या सावलीतून बाहेर येत 400 मीटर हर्डल्समध्ये 46.46 सेकंदांच्या वेळेनिशी या गतविजेत्याला हरवून आपले पहिले मोठे वैयक्तिक विजेतेपद मिळविले. ब्राझीलच्या एलिसन दोस सांतोसने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिसरे स्थान पटकावले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article