बहुप्रतिक्षित डब्बा कार्टेल या वेबसीरिजमध्ये शबाना आझमी आणि गजराज राव एकत्र
मुंबई
बहुप्रतिक्षित अशा गुन्हेगारीवर आधारित डब्बा कार्टल या वेबसिरीजमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि आपल्या साध्या सहज अभिनयाने भूमिकेचा छाप पाडणारे अभिनेता गजराज राव एकत्र दिसणार आहेत.
यापूर्वी या दोघांनी एकत्र काम केले नसल्याने ही वेबसीरीज ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गजराज राव यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव, आणि आनंद शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये गजराज रावसोबतचा एक फोटो पोस्ट करत, शबाना आझमी यांनी त्यांच्या अधिकृत आयजीवर लिहिले, "आम्हाला "डब्बा कार्टेलमध्ये" एकत्र काम करण्यासाठी एकही सीन मिळाला नाही पण लवकरच प्रतिभावान गजराजरावसोबत जोडी करायला आवडेल. गजराज तुम्हाला माहित आहे का की फराहखान तुमची चाहती आहे?"
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चित्रपट निर्माती फराह खानने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "मी एएमएमएमएमएम!!", असे लाल हृदयाच्या इमोजीसह लिहीले आहे.
शबाना आझमी आणि गजराज राव यांना स्क्रीन स्पेस शेअर करताना पाहणे रोमांचक ठरणार आहे.
डब्बा कार्टेलबद्दल बोलताना दिग्दर्शक हितेश भाटिया म्हणाले, “डब्बा कार्टेलचे दिग्दर्शन हा एक अविश्वसनीय अनुभव होता. त्याच्या मुळाशी, हा एक आकर्षक गुन्हेगारी नाट्य आहे, परंतु त्याला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भावनिक खोली, धैर्य, बुद्धिमत्तेने उच्च-स्तरीय जगात नेव्हिगेट करणारे गतिमान पात्रं. वेबसिरीजमध्ये सर्वच कलाकारांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे आणि नेटफ्लिक्सवरील गुन्हेगारी आणि जगण्याच्या या रोलरकोस्टरमध्ये प्रेक्षकांना उतरविण्यासाठी मी उत्सुक आहे.”
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डब्बा कार्टेलच्या ट्रेलरमधून आपल्याला पाच मध्यमवर्गीय महिलांच्या प्रवासाची झलक दिसली. ज्यांचा निष्पाप दिसणारा डब्बा व्यवसाय हा ड्रग्ज कार्टेलच्या धोकादायक जगात एक भयानक अनुभव दाखवतो. डब्बा कार्टेल २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या वेबसिरीजमध्ये शबाना आझमी, गजराज राव यांच्यासह, ज्योतिका, निमिषा सजयन, शालिनी पांडे, अंजली आनंद, सई ताम्हणकर, जिशु सेनगुप्ता, लिलेट दुबे आणि भूपेंद्र सिंग जादावत आदी कलाकार दिसणार आहे.
या वेबसीरीज चे दिग्दर्शक हितेश भाटिया आहेत. तर विष्णू मेनन आणि भावना खेर यांनी ही वेबसीरीज लिहिली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, डब्बा कार्टेल ही शिबानी अख्तर, विष्णू मेनन, गौरव कपूर आणि आकांक्षा सेडा यांची निर्मिती आहे.